बारामती, 21 नोव्हेंबरः बारामती शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. यामुळे बारामती शहरातील नागरिकांनी पाण्याचा साठा करून पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन बारामती नगर परिषदेकडून करण्यात आले आहे.
मोरगावचा पाणीपुरवठा ठप्प
निरा डावा कालव्यामधील प्रवाह बंद झाल्याने तसेच सोमेश्वर गावाजवळ निरा डावा कालव्याची भिंत पडल्याने कलव्याला पाणी पुरवठा उशीरा होणार आहे. तसेच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात मर्यादीत पाणी उपलब्ध आहे. यामुळे शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे. त्यानुसार 22 नोव्हेंबर (मंगळवार) आणि 24 नोव्हेंबर (गुरुवार) 2022 रोजी शहराला पाणीपुरवठा होणार नाही. तसेच 23 नोव्हेंबर (बुधवार) 2022 रोजी शहराला पाणीपुरवठा होणार आहे. यामुळे बारामती शहरातील नागरीकांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी ‘भारतीय नायक’शी बोलताना केले आहे.
साठवण तलावाच्या खोदकामामुळे बारामतीचा रस्ता झाला धुळग्रस्त!
One Comment on “बारामतीचा पाणीपुरवठा राहणार बंद!”