बारामती ते मुंबई रेल्वे सेवा लवकरच सुरु होणार?

बारामती, 18 नोव्हेंबरः बारामती येथील औद्योगिक, शैक्षणिक व कृषी क्षेत्रातील विकासाला आणखी चालना मिळावी, यासाठी काही नागरीकांनी मुंबई रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे आज, 18 नोव्हेंबर 2022 रोजी बारामती येथील गोविंदबाग येथे केली आहे. आपण रेल्वे मंत्रालयाशी बोलू, अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळेंनी दिली.

10वी-12वी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

उद्योग व्यवसाय, शिक्षणाच्या निमित्ताने बारामतीत दररोज हजारो कामगार, विद्यार्थी व नागरिक ये-जा करत असतात. बारामती एमआयडीसीमधील औद्योगिक क्षेत्रात तब्बल 30 हजारहून अधिक कामगार काम करताहेत. तसेच परगावहून बारामती शहरात नियमित ये-जा करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे.

बारामती प्रीमियर लीगच्या थरारक पर्व 4 ला उद्यापासून सुरुवात!

बारामतीहून मुंबईला आणि मुंबईहून बारामतीला नियमित प्रवास करणाऱ्या नागरीकांची संख्या लक्षणीय आहे. सध्या केवळ एसटी बसच सेवा उपलब्ध आहे. एसटी प्रवास वेळखाऊ असल्याने नाईलाजाने खाजगी वाहनाने खर्चिक व असुरक्षित प्रवास करावा लागतो. यामुळे बारामती ते मुंबई रेल्वे सेवा पुर्वी प्रमाणे पुन्हा चालू करावी, अशी मागणी मोठ्या प्रमाणातून रेल्वे प्रवाशांकडून होताना दिसत आहे.

One Comment on “बारामती ते मुंबई रेल्वे सेवा लवकरच सुरु होणार?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *