बारामतीत बर्गे चोरणाऱ्या टोळीला अखेर अटक

बारामती, 30 ऑक्टोबरः बारामती तालुक्यातील मौजे लाटे गावाच्या हद्दीतील निरा नदीच्या बंधाऱ्या जवळील पाटबंधारे विभाग चौकीच्या मागील बाजूच्या मोकळ्या मैदानातून 17 ते 23 ऑक्टोबर 2022 दरम्यान 57 हजार रुपयांची तब्बल 40 लोखंडी बर्ग्यांवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. सदर प्रकरणात वडगाव पाटबंधाऱ्याचे कर्मचारी राजेंद्र कदम यांनी फिर्याद दिली. सदर फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गु. र. नं. 359 / 2022 भादवि 379 प्रमाणे 24 ऑक्टोबर 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.  

सदर गुन्ह्याचे तपासात बंधाऱ्याचे बर्गे चोरी झाल्याबाबत माहिती मिळणे कामी खूप मोठ्या प्रमाणात सी. सी. टी. व्ही कॅमेरांची पडताळणी करण्यात आली. तांत्रिक माहीती तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी निष्पन्न झाले. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे स. पो. नि. सोमनाथ लांडे तसेच पोलीस तपास पथक यांनी संबंधित संशईत आरोपी गणेश जाधव (रा. निरा ता पुरंदर) यास निरा येथून ताब्यात घेतले. सदर गुन्ह्यांचे अनुशंगाने चौकशी केला असता संशयित आरोपीने इतर साथीदार शुभम बरकडे (रा. लोणंद ता खंडाळा, जि. सातारा), विकास गायकवाड (रा. बोरीऐंदी ता. दौंड, जि पुणे), विशाल चव्हाण (रा. निरा), शशांक सोनवणे (रा.निरा), आर्यन माचरे (रा. पाडेगाव ता खंडाळा, जि. सातारा), शुभम माचरे (रा. पाडेगाव ता. खंडाळा) यांना अटक करण्यात आली.

बारामतीत भावाची निर्घृण हत्या

तसेच गुन्ह्यातील चोरीचा माल घेणारा अभिजित भोसले (रा. यवत, ता. दौंड जि पुणे) यांच्यासोबत बारामती तालुक्यातील लाटे येथील निरा नदीचे पात्रातील बंधाऱ्याचे बर्गे चोरीच कबूल केले. सदर गुन्ह्यात वापरलेले वाहन टाटा कंपनीचा टॅम्पो एमएच 12 सीटी 9000 हा जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्यात चोरी गेलेले 5 लोखंडी बर्गे जप्त केले आहेत.

बारामती नगर परिषदेच्या नुतन इमारतीचा कोसळला भाग?

सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामती विभागचे अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, बारामती उपविभागचे उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे तसेच पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार, सहाय्यक फौजदार महेश पन्हाळे, पोलीस हवालदार महेंद्र फणसे, पोलीस हवालदार रमेश नागटिळक, पोलीस हवालदार सूर्यकांत कुलकर्णी, पोलीस नाईक हिरामन खोमणे, पोलीस नाईक भाऊसाहेब मारकड, पोलीस शिपाई पोपट नाळे, अमोल भुजबळ, किसन ताडगे, आबा जाधव, विलास ओमासे, चा. पो. ना. विजय शेंडकरस, होमगार्ड निलेश खामगळ, वैभव कुंभार यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार महेश पन्हाळे हे करीत आहेत.

One Comment on “बारामतीत बर्गे चोरणाऱ्या टोळीला अखेर अटक”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *