बारामती, 9 नोव्हेंबरः बारामती तालुका खरेदी विक्री संघाची सन 2022-27 ही पंचवार्षिक निवडणूक नुकतीच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध करण्यात आली होती. अजित पवार यांच्या सूचनेनुसार आज, 9 नोव्हेंबर 2022 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी चेअरमन पदासाठी दत्तात्रय आवाळे (रा.सावळ) यांची तर व्हाईस चेअरमन पदी बाळासाहेब मोरे (रा.अंजनगाव) यांच्या नावाची घोषणा या बैठकीत केली.
बारामती नगरपरिषदेचे पथविक्रेत्यांना आवाहन
या निवडणुकीत दोन पदासाठी दोनच फॉर्म आल्यामुळे सदरची निवडणूक बिनविरोध झाली. नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हा.चेअरमन यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी संदीप जगताप, धनवान वदक, तानाजीराव खोमणे, दशरथ धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
माळेगावात ‘सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम’चे आयोजन
One Comment on “बारामती तालुका खरेदी-विक्री संघाची बिनविरोध निवडणूक”