बारामती, 29 मेः बारामती प्रांत कार्यालयात अधिकारी, कर्मचारी कमी आणि दलाल जास्त अशी अवस्था झाली आहे. प्रत्येक अधिकारी व कर्मचारी वाजे असल्याचे समजते. वाळू वाहतूक दंड कमी करण्यासाठी मोठी गर्दी पाहण्यास मिळते. बरेच राजकीय पुढारी अशा राजकीय दलालामार्फत आपली कामे करून घेताहेत. बेकायदा खडी क्रेशर असो व नॉन क्रिमिनलचा दाखला असून सर्वसामान्यांना बिनकामाचे दलाल कार्यालयांमध्ये फिरत असल्याचे दिसतात.
रोजचे बकरे फडकने व सर्व्हिस छाटणे तेवढेच काम या दलालांना दिसते. आता तर पालखी मार्गाच्या कामात दलालांचा सुळसुळाट झाला आहे. दलाल शिवाय टेबल पुढे सरकत नाही. पालखी मार्ग कुठे वळवायचा, कधी पंचनामा करायचा मुल्यांकनमध्ये कधी फेरफार करायचे, हे चालत बोलत संगणक दलाल आहेत. प्रांत कार्यलयामध्ये दररोज हे दलाल कार्यालयात कुणाच्या आशीर्वादाने फिरतात व मलिदाचा हिस्सा कुणाला जातोय, ही रसभरी चर्चा सर्वसाधारण लोकांच्या खिशाला चाट देऊन लोक करत असतात.