बारामती सरकारी कार्यालयात खाजगी एजेन्टचा सुळसुळात!

बारामती, 20 एप्रिलः (विश्वजीत खाटमोडे) उन्हाळा म्हटलं की, सर्वसामान्यांसोबत अनेकांना वेगवेगळ्या कारणास्तव सरकारी कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागताच. नुकतीच इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या बोर्डची परीक्षा झाल्या. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी लागणाऱ्या कागदपत्राच्या जमवाजमव करण्यासाठी अनेकजण सरकारी कार्यालयाचे उंबरे झिजवताना दिसत आहेत. मात्र, सरकारी कार्यालयात वेगळेच चित्र दिसत आहे. सरकारी बाबूंसाठी ठेवण्यात आलेल्या खुर्चीवरच खाजगी एजेन्ट थांड मांडून बसला आहे.



पालक विद्यार्थ्यांकडून सरकारी कागद पत्रे काढण्यासाठी या एजेन्टकडून ज्यादाचे पैसे उकळण्यात येतात. मात्र, असे होत असताना सरकारी कार्यालयातील बडे अधिकारी डोळे, कान, तोंड बंद करून बसले आहेत. ‘अंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय’ असं चित्र सध्या सरकारी कार्यालयात दिसत आहे.



तसेच सध्या या सरकारी कार्यालयातून उत्पन्न दाखला, संजय गांधी निराधार योजना यासह इतर सरकारी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. मात्र सरकारी योजनांचे जे निकष आहेत, त्यामध्ये काही लोक अपात्र ठरतात. मात्र अशांकडून ज्यादा पैसे घेऊन त्यांना त्या त्या योजनेत बसविले जाते. खाजगी एजेन्ट ही सरकारी कार्यालयांना लागलेली वाळवीच आहे, जी प्रशासनाला अतूनच पोकळ करत चालली आहे.



मात्र, अधिकारी हा मलिदा खाऊन टुंब फुगला आहे. असंच काही बारामती तालुक्यातील ज्या गावात कोतवाल आहेत, तेथे सुद्धा असेच चित्र आहे. यात गाव तलाठी हा मुख्य सुत्रधार असतो. या एजेन्टना त्याचे जास्त सहकार्य असते. बारामती तालुक्यातील कऱ्हा वागज, मळद, मोरगांव, माळेगाव, जळगाव, सुपे, शिरवली, बारामती जळोची, शिरसणे, गोखली या ठिकाणी कोतवाल असताना सुद्धा एजेन्टचा मोठ्या प्रमाणात वावर दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *