बारामती प्रिमियर लीग 2024 क्रिकेट स्पर्धा संपन्न! शिवशंभू स्माशर्स संघाने पटकावले विजेतेपद

बारामती, 27 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) बारामती प्रिमियर लीग 2024 ही क्रिकेट स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेचे हे पाचवे पर्व होते. या क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना 25 फेब्रुवारी रोजी शिवशंभो स्मशर्स विरुद्ध फॉर्चुन 9291 टायगर्स या दोन संघामध्ये झाला. या सामन्यात शिवशंभू स्माशर्स हा सचिन दातिर यांच्या मालकीच्या संघाने विजय मिळवला. तर फॉर्चून 9291 टायगर्स हा संघ उपविजेता ठरला.



तत्पूर्वी, या अंतिम सामन्याची नाणेफेक बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच या सामन्यानंतर विजेत्या आणि उपविजेत्या संघास रोख रक्कम आणि ट्रॉफी बक्षीस म्हणून देण्यात आले. यावेळी बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँगेस पार्टीचे बारामती शहर अध्यक्ष जय पाटील, पिंटू गायकवाड, डॉ. योगेश मुळीक, गुनवडीचे सरपंच घोडे, गुनवडी ग्रामपंचायत सदस्य खोमणे, संतोष सातव, अमोल पिसाळ, विजय जगदाळे, अनिल विटकर, उमेश शिंदे, ओंकार जाधव यांच्यासह स्पर्धेत सहभागी सर्व संघाचे संघ मालक आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.



दरम्यान, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुख्य आयोजक म्हणून रविंद्र सोनवणे, अभिजीत कांबळे ,योगेश व्हटकर, सूरज अहिवळे यांच्यासह आमराई बॉईज क्रीडा प्रतिष्ठान मधील सर्वच सहकाऱ्यांनी अपार कष्ट घेतले होते. या कार्यक्रमाच्या शेवटी बारामती प्रीमियर लीग स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचेच आभार आयोजकांकडून मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *