बारामती पोलिसांचे नागरीकांना आवाहन!

बारामती, 4 ऑक्टोबरः बारामती शहर पोलीस ठाण्यात अनेक वर्षापासून बेवारस स्थितीत असलेल्या मोटरसायकलचा लवकरच जाहीर लिलाव होणार आहे. याबाबत बारामती शहर पोलिसांनी त्यांचे मालक शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करूनही सदर मोटरसायकली नेण्यासाठी कोणी आलेले नाही, म्हणून त्या वाहनांचा लिलाव करावा, याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक यांना सादर केलेला आहे.

सोमेश्वर कारखान्याचा गळीत हंगाम 9 ऑक्टोबरपासून सुरु

सदर बाबत जाहीरनामाही निघालेला आहे. तरीसुद्धा तमाम नागरीकांना कळवण्यात येते की, या सोबत आपल्याला एक लिंक पाठवत आहोत, तरी आपली गाडी या बेवारस गाड्यांमध्ये आहे का? याबाबत आपण खालील लिंकवर जाऊन माहिती घेऊ शकता आणि तशी जर आपल्याला आपल्या मोटरसायकलशी मॅच होणारी माहिती या लिंकमध्ये मिळाली तर आपण बारामती शहर पोलीस ठाण्याशी किंवा जिल्हा वाहतूक शाखेची संपर्क करावा, असे आवाहन बारामती शहर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.

एमपीएससी पद भरतीचा मार्ग मोकळा

आपली गाडी बेवारस गाड्यात आहे का? हे शोधण्यासाठी खालील लिंकचा वापर करा.
https://puneruralpolice.gov.in/files/Flash/42.pdf

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *