बारामती पंचायत समितीचं आरक्षण जाहीर

बारामती, 28 जुलैः बारामती पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक 2022 साठीचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सदर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज, सकाळी शहरातील नवीन प्रशासकीय भवन समोरील कविवर्य मोरोपंत नाट्य मंदिरात पार पडला. या कार्यक्रमात तालुक्यातील 14 गणांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या उपस्थितीत बारामती पंचायत समितीचे गण रचनेचे आरक्षण जाहीर करण्यता आले. आरक्षण सोडतीच्या चिठ्ठ्या उचलण्यासाठी लहान मुलांना बोलविण्यात आले होते.

राज्यातील 92 नगरपरिषदांची निवडणुका ओबीसी आरक्षणाविनाच!

बारामती पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक 2022 साठीच्या गण रचनेनुसार आरक्षण पुढील प्रमाणे आहे.

बारामती तालुक्यातील सुपा, शिर्सुफळ, काटेवाडी, वाघळवाडी आणि निंबुत या गणांवर सर्वसाधारण आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. तर डोर्लेवाडी, पणदरे, मोरगाव आणि मूढाळे या गणांसाठी सर्वासाधरण (महिला) आरक्षण जाहीर झाले आहे. यासह निरावागज आणि कऱ्हाटी या गणांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) तसेच सांगवी या गणासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण सोडत निघाली आहे. तर गुणवडी या गणावर अनुसूचीत जातीचे आणि वडगाव निंबाळकर या गणासाठी अनुसूचित जाती (महिला) आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, निवासी नायब तहसिलदार विलास करे, तहसिल कार्यालयातील कर्मचारी यासह विविध पक्षाचे पदाधिकारी तसेच नागरिकांनी उपस्थिती लावली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *