बारामती, 9 मार्चः बारामती नगर परिषदेच्या हद्दीत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) घरकूल अंमलबजावणीत बारामती नगर परिषद अव्वल स्थान पटकविले आहे. बारामती नगर परिषदेचे एकूण 4 डीपीआर मंजूर आहेत. बारामती नगरपरिषदेच्या कर्तव्यदक्षता अधिकाऱ्यांमुळे बारामती शहरातील 512 लाभार्थ्यांना प्रत्येकी अडीच लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे.
छत्रपती शिवाजी विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा
सदर योजना राबविण्यासाठी कर्तव्यदक्ष बानपचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी विशेष मेहनत घेतल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर लाभार्थ्यांना घरकूल बांधकाम करण्यासाठी बांधकाम आराखडा मंजुरी कार्यक्षम अधिकारी सहाय्यक नगर रचनाकार ऋषिकेश साळी व रचना सहायक शंतनु बारवकर यांनी जलदगतीने देण्यात आल्यामुळे हे शक्य झाले आहे.
आश्रम शाळेत वाढदिवस साजरा करत जपली सामाजिक बांधिलकी
तसेच प्रकल्प अधिकारी विक्रम बालगुडे आणि रियाज काजी यांनी सांगितल्याप्रमाणे 175 लाभार्थ्यांना अडीच लाख रुपये अनुदान वितरीत केले आहे. उर्वरित लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने बांधकाम प्रगतीनुसार अनुदान वितरण करण्यात येत आहे. आतापर्यंत 512 लाभार्थ्यांना एकूण 7 कोटी अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहेत.
स्वतः जातीने लाभार्थ्यांच्या अडी अडचणी सोडवून लाभार्थ्यांना लाभ मिळावा, म्हणून सतत अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतल्यामुळे जनसामान्यात संबंधित अधिकाऱ्यांची स्तुती केली जात आहे.
2 Comments on “प्रधानमंत्री आवास योजनेत जिल्ह्यात बारामती नगर परिषद अव्वल”