बारामती, 18 ऑक्टोबरः बारामती नगर परिषदेच्या वतीने आज, 18 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी प्लास्टिक विरोधात धडक कारवाई करण्यात आली. सदर कारवाई बारामती शहरातील सस्ते सुपर मार्केटवर करण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनाचे बारामतीकरांना आवाहन
सदर कारवाईत सस्ते सुपर मार्केटमधून 1000 प्लास्टिक पिशव्यांसह 10 किलोचे प्लास्टिक जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई करतानाचा एक व्हिडीओ समोर येत आहे. या व्हिडीओमध्ये दुकानदार बानपच्या कर्मचाऱ्याला सर्वच प्लास्टिक नका नेऊ, असे सांगत आहे. मात्र बानप कर्मचारी हा दुकानदाराला प्लास्टिक ठेवायचंच नाही, असे सांगून सरकार कामात अडथळा आणू नका, असे सांगताना दिसत आहेत.
कऱ्हा नदीच्या पाणी पात्रात मोठी वाढ!
One Comment on “बारामती नगर परिषदेची प्लास्टिक विरोधात धडक कारवाई”