बारामती नगरपरिषद पार्किंग खासगी वाहनांसाठी आरक्षित

बारामती, 19 जूनः बारामती नगरपरिषद कार्यालय कामकाजासाठी व कर्मचाऱ्यांसाठी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. परंतु बडे राजकारणी, स्वतःला प्रतिष्ठित मानणारे आपल्या महागड्या गाड्या बारामती नगरपरिषदमध्ये पार्किंगला लावत आहे.

रात्रंदिवस बारामती नगर परिषद कर्मचाऱ्यांचे व नागरिकांची गैरसोय करीत आहे. या महागड्या गाड्यांबद्दल सुरक्षा रक्षकाला विचारले असता सदरच्या गाड्या कोणाच्या आहेत, माहिती नाहीत. तसेच सांगण्यास टाळा टाळ केली. याबाबत वरिष्ठांकडे चौकशी केल्यास उडवा उडवीची उत्तरे मिळाली आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *