बारामती नगर परिषदेचा ढिसाळ कारभार; गणेश मुर्त्यांची विटंबना!!

बारामती, 15 सप्टेंबरः गेल्या दोन वर्षांच्या कोरोना काळात गणेशोत्सव साजरा करता आला नाही. परंतु यंदाच्या वर्षी धुमधडाक्याने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. तसेच गणपती विसर्जन ही मोठ्या आनंद उत्सवाने साजरे करण्यात आला. आनंद चतुर्थीला 9 सप्टेंबर 2022 या दिवशी गणेश मूर्ती विसर्जन करण्यात आले. बारामती नगरपरिषदेनी बारामती निरा डावा कालवा पाणी प्रदूषण रोखण्यासाठी गणपती विसर्जन हे जलकुंडात करावे, असे आवाहनही केले होते. तसेच गणपती विसर्जन केलेल्या संकलन रथची सोय बारामती नगरपालिकेकडून करण्यात आली.

सोमेश्वरची वार्षिक सर्वसाधारण सभेची तारीख जाहीर

मात्र गणेश विसर्जनाच्या दिवशी बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांचा नियोजनाचा अभाव दिसून आला. लोकांमध्ये प्रबोधन करण्यास बारामती नगरपरिषद कमी पडल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले. तसेच बानपच्या अधिकाऱ्यांमध्ये सुसंवाद नसल्याचे दिसून आले. बानपचे मुख्याधिकारी यांनी ज्या उपायोजना राबवायच्या होत्या, त्या राबवल्या. परंतु त्यांची अंमलबजावणी अधिकाऱ्यांकडून झालीच नसल्याचे चित्र होते. बारामती नगर परिषद गणेश भक्तांना प्रबोधन करण्यास कमी पडली आहे, असे प्रथम दर्शनी दिसून आले.

बारामतीत जलकुंडांऐवजी वाहत्या पाण्यात गणेश मुर्ती विसर्जनास पसंती

बारामती पर्यावरण विभागाचे प्रमुख आणि आरोग्य अधिकारी आदित्य बनकर यांनी गणेश भक्तांना आवाहनासह सूचना केल्या नाही. त्यामुळे गणेश मुर्त्या या जलकुंडामध्ये विसर्जित झालेल्या नाहीत किंवा नगरपरिषद यांच्याकडे जमा झालेल्या नाहीत. त्यामुळे गणेश मुर्त्या या कऱ्हा नदीसह कॅनॉलमध्ये दिसून येत आहेत. यामुळे नदी आणि कॅनॉलमधील पाण्याच्या प्रदूषण वाढण्याची शक्यता आहे. बारामती नगरपरिषदेचे पर्यावरण प्रमुख आणि आरोग्य अधिकारी आदित्य बनकर यांनी जर प्रत्येक गणेश भक्तांना आवाहन व सूचना केल्या असत्या तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती, असे लोकांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे पर्यावरण प्रेमी आणि नागरिकांनी ‘भारतीय नायक’चे वृत्त संपादक सम्राट गायकवाड आणि कार्यकारी संपादक अभिजीत कांबळे यांना सांगितले आहे. सदर हलगर्जीपणामुळे गणेश भक्तांमध्ये बारामती नगरपरिषद विरुद्ध तीव्र नाराजी पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *