बारामती नगरपरिषदेचे पथविक्रेत्यांना आवाहन

बारामती, 9 नोव्हेंबरः केंद्र शासन पुरस्‍कृत प्रधान मंत्री पथविक्रेता आत्‍मनिर्भर निधी पथविक्रेत्‍यांसाठी सूक्ष्‍म – पतपुरवठा सुविधा योजनेची अंमलबजावणी करण्‍यास शासन निर्णय क्रं. पीएमस्‍वनिधी – 2020/ प्र. क्र. 77/ नवि-20, दि. 17 जून 2020 अन्‍वये सुचित केलेले आहे. तरी बारामती शहरामधील विक्री/व्‍यवसाय करणाऱ्या फेरीवाले/ पथविक्रेते / लघु व्‍यावसायिक यांनी लाभ घ्‍यावा, असे आवाहन बारामती नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

माळेगावात ‘सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम’चे आयोजन

लाभाचा तपशिलः-

1.नागरी पथविक्रेत्यांना रक्‍कम रूपये 10,000/- 20,000/- व 50,000/- पर्यंतचे बँकेमार्फत विनातारण खेळते भांडवल कर्ज उपलब्‍ध करून दिले जाईल. ​
2.सदर कर्जावर आर. बी. आय. च्‍या प्रचलित दराप्रमाणे व्‍याज दर लागू राहिल. तसेच त्‍याचे दरमहा हप्‍त्‍याने परतफेड केल्‍यास 7 टक्क्यांवरील व्‍याज अनुदानाचा लाभ दिला जाईल.
3.नियमित डिजिटल व्‍यवहार केल्‍यास कॅश – बॅकसाठी पात्र.

पात्र लाभार्थीः-
1.बारामती नगरपरिषदेने केलेल्‍या फेरीवाल्‍यांच्‍या सर्वेक्षणात आढळलेले परंतू त्‍यांना विक्री प्रमाणपत्र/ ओळखपत्र दिले गेले नाही, असे पथविक्रेते.
2.बारामती शहरामध्‍ये विक्री / व्‍यवसाय करणारे पथविक्रेते

बारामतीत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू

आवश्‍यक कागदपत्रेः-
1.आधारकार्ड व आधारकार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर
2.मतदान ओळखपत्र
3.रेशनकार्ड
4.बँक पासबुक झेरॉक्‍स

ऑनलाईन अर्ज करण्‍याची प्रक्रिया
1.पोर्टल ( http://pmsvanidhi.mohua.gov.in)

अधिक माहितीसाठी संपर्क
अली मुल्‍ला ( 8888849083 ) पहिला मजला, शहर अभियान व्‍यवस्‍थापन कक्ष .दीअंयो-राष्‍ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) महिला व बालकल्‍याण विभाग, बारामती नगरपरिषद, बारामती.

विशेष मोहीम अंतर्गत बारामती नगरपरिषदमध्ये सर्व ऑनलाईन प्रक्रिया करून दिली जात आहे. फक्त कागदपत्रे घेऊन यावीत.

One Comment on “बारामती नगरपरिषदेचे पथविक्रेत्यांना आवाहन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *