सुट्टी दिवशीही बारामती नगरपरिषद राहणार सुरु!

बारामती, 7 एप्रिलः एप्रिल महिन्यात अनेक सुट्टी असणार आहे. यामुळे बारामतीकरांच्या सोयीसाठी सुट्टीच्या दिवशीही बारामती नगरपरिषदेचे कामकाज चालू राहणार असल्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले आहे. आज, 7 एप्रिल 2023 रोजी गुड फ्रायडे असून आजच्या दिवशीही बानपमधील पाणीपट्टी, घरपट्टी यासह इतर कर भरणा संकलन केंद्र सुरु राहणार आहेत.

दप्तर दिरंगाई कायदा अन्वये मंडल अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

विशेष म्हणजे आज, शुक्रवारी बानपमध्ये कर्मचारी आणि मुख्याधिकारी उपस्थित राहून बारामतीकरांच्या सोयीसाठी कामकाज चालू ठेवलेले आहे. या सुविधांचा नागरिकांनी फायदा घेऊन आपल्या थकीत कर भरून नगरपरिषदेला सहकार्य करण्याचे आवाहनही मुख्याधिकारी रोकडे यांनी केले आहे.

मुर्टीत माजी विद्यार्थ्यांनी 32 वर्षांनी भरवला दहावीचा वर्ग

यासह नगरपरिषदेची ऑनलाईन सुविधाही सुरु असल्याचे मुख्याधिकारी रोकडे यांनी ‘भारतीय नायक’शी बोलताना सांगितले आहे. सध्या थकबाकीदारांची यादी बनवनेचे काम सुरु असल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली आहे.

One Comment on “सुट्टी दिवशीही बारामती नगरपरिषद राहणार सुरु!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *