मुंबई, 6 जूनः (प्रतिनिधी- अभिजीत कांबळे) राज्य सरकारच्या वतीने मुंबई येथे नुकताच जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानामध्ये बारामती नगरपरिषदेचा तृतीय क्रमांक मिळाला असून 3 कोटी रुपये आणि प्रमाणपत्र असा पुरस्कार मिळाला आहे. सदर कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रधान सचिव प्रवीण दराडे, स्वित्झर्लंडचे भारतीमधील राजदूत मार्टिन यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण करण्यात आले.
मोईन बागवान आणि स्वराज वाबळे यांची एमपीएलच्या लिलाव प्रक्रियेसाठी निवड
या कार्यक्रमासाठी मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह नगर अभियंता रत्नरंजन गायकवाड, महिला बालकल्याण विभागप्रमुख आरती पवार, आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, अजय लालबिगे, सुनील धुमाळ, माजिद पठाण, विजय शितोळे, गौरव दुरुगकर, शंतनू बारवकर, संतोष तोडकर, विक्रम बालगुडे, रणजित अहिवळे, निखिल शीलवंत, सचिन खोरे, आदित्य बनकर आदी उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनासाठी पृथ्वी, वायु, आकाश, अग्नि, जल या पंच महाभुतांमध्ये केलेल्या विविध सकारात्मक कामाचे सर्वेक्षण करुन त्यातून हे पारितोषिक प्रदान केले गेले.
श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचा 96 टक्के निकाल
- भूमी तत्त्वामध्येः रियाज काझी, विक्रम बालगुडे, जमाल शेख
- आकाश तत्त्वमध्येः आरती पवार, अली मुल्ला
- ऊर्जा तत्त्वामध्येः रत्नरंजन गायकवाड
- जल तत्त्वामध्येः भापकर व सुनिल धुमाळ
- ग्रीन बिल्डिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्येः शंतनू बारवकर आणि साळी
One Comment on “माझी वसुंधरा अभियानात बारामती नगरपरिषदेचा पुन्हा डंका”