बारामती नगरपरिषदेच्या एनडीके ठेकेदाराची कामगारांवर मुजोरी

बारामती, 5 मार्चः बारामती नगर परिषदेचे सफाई कामगार ठेकेदार एनडीके हॉस्पिटॉलिटी एलएलपी या ठेकेदाराची कामगार महिलांवरील शोषण धोरण थांबता थांबेना! मागील खेपेस एका सुपरवायझरने बानपच्या एका महिला सफाई कर्मचाऱ्याबद्दल अभद्र टिप्पणी केलेल्याची ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे बानपच्या महिलांबाबत असुरक्षितता भावना निर्माण झाली आहे. परंतु त्या नराधमास कुठलेच शासन झालेले नाही.

सदर प्रकरण काही दलाल पुढाऱ्यांनी दाबले. तसेच गोरगरीब महिला कर्मचाऱ्यांवर अन्याय केला. या घटनेनंतर कोणी काही करत नाही, अशी भावना निर्माण झाली आहे. परिणामी धनंजय जाधव हा सुपरवायझर एनडीके हॉस्पिटॉलिटी या ठेक्यांमधील सुपरवायझरने पुन्हा एका आबला महिला कर्मचाऱ्याचा हात धरून बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.

सदरची घटना 16 फेब्रुवारी 2023 रोजी घडली असून पीडित महिलेची फिर्याद 3 मार्च 2023 रोजी दाखल केली. दरम्यान, सदर महिला दररोज पोलीस स्टेशनचे हेलपाटे मारत होती. मात्र पीडितेची फिर्याद वेळेत घेतली गेलेली नाही.

अ‍ॅड. काळेंच्या युक्तीवादाने माजी नगरसेवकाची निर्दोष मुक्तता

या प्रकरणात अनेक पोलीस, दलाल पुढाऱ्यांनी मिटविण्यासाठी दबाब यंत्रणा वापरली. परंतु अन्यायग्रस्त महिलेने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सदरचा गुन्हा नोंद करण्याचा आग्रह धरला. या प्रकरणात गुन्हा नोंदणीच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर चौकशी होऊन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जनसामान्यांमध्ये होत आहे.

बारामतीतील महिला असुरक्षित झाले असल्याची भावना तीव्र झाली आहे. बारामतीमधील पुढारी व पोलीस प्रशासन लिंगपिसाट पक्ष कार्यकर्त्यांना व त्यांच्या हित संबंध असणाऱ्यांना पाठीशी घालत आहे.
दरम्यान, बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तारांगण गार्डन शेजारी जिजाऊ शिवसृष्टी कॉर्नरजवळ एका महिलेवर दिवसाढवळ्या बलात्कार केल्याची घटना घडली असून अद्यापही संशयित आरोपी अजूनही मोकाट आहे. राष्ट्रवादीच्या एक कार्यकर्त्याचा नातेवाईक असलेल्याने संशयित आरोपी हा मोकाट असल्याची चर्चा आहे.

बारामतीमध्ये तालुका आणि शहर आरपीआयकडून विजयी आनंदोत्सव साजरा

एनडीके हॉस्पिटॉलिटी ही कंपनी राष्ट्रवादी धार्जिण कंपनी असून सातत्याने कर्मचाऱ्यांवर व विशेषतः महिला कर्मचाऱ्यांवर अन्याय- अत्याचार करत आहे. तरीही पोलीस प्रशासन, नगरपरिषद प्रशासन व राजकीय पुढारी सर्वसामान्यचं प्रकरण दाबून टाकत आहे. या घटनांनंतर सर्वसामान्यांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झाले.

One Comment on “बारामती नगरपरिषदेच्या एनडीके ठेकेदाराची कामगारांवर मुजोरी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *