या कार्यक्रमानुसार शुक्रवारी 22 जुलै ते 28 जुलै 2022 पर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर नामनिर्दशन पत्र भरण्यासाठी उपलब्ध होणार आहे. तसे 22 जुलै ते 28 जुलै 2022 दरम्यान, सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहेत. मात्र शनिवार, 23 जुलै आणि रविवार, 24 जुलै 2022 रोजी सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार नाहीत.
नामनिर्देशन पत्राची छाननी आणि वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी शुक्रवारी, 29 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजल्यानंतर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासह गुरुवार, 4 ऑगस्ट 2022 दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची अंतिम दिनांक असेल.
अपिलाच्या निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल, त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी परंतु सोमवार, 8 ऑगस्ट 2022 पर्यंत करता येणार आहे. बारामती नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2022 चा मतदानाची दिनांक 18 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7.30 पासून सायंकाळी 5.30 पर्यंत असणार आहे. तसेच 19 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मिळणार पथकर सवलत प्रमाणपत्र