बारामती एमआयडीसीमध्ये अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे गोड बंगाल!

बारामती, 17 जूनः (प्रतिनिधी- अभिजीत कांबळे) महाराष्ट्र औद्योगिक वसाहत मंडळ, बारामती विभाग व उपविभाग यामध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि बदलांचे गोड बंगाल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बारामती एमआयडीसी ही विकसित एमआयडीसी असून औद्योगिक विकासामुळे बारामतीचा आर्थिक विकासही होत आहे. या आर्थिक प्रभोलनमुळे एमआयडीसीतील कर्मचारी, अधिकारी बारामती सोडून जाण्यास तयार नसतात. त्यामुळे बारामती एमआयडीसीमध्ये अनेक नियमबाह्य विकास झाल्याचे दिसून येते.

वृक्षतोड, पर्यावरणविरुद्धी प्रकल्प, बेकायदेशीर वाहन तळे, बेकायदेशीर इमारती, अतिक्रमणे, अस्थायी अतिक्रमणे त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, खुल्या जागेवरील बांधकामे, नियमबाह्य प्लॉट विभाजन अशी अनेक प्रकरणे या बदल्यांमुळे बारामती एमआयडीसी व बारामती विभागांमध्ये घडत आहेत.

संकल्प नव्हे कृती करूया, पर्यावरणासाठी कटिबध्द होऊया..

पी. एम. गुरव, आर. टी. माने, आणि टी. डी. शिंदे हे सरकारीबाबू बारामती विभागाचे कार्यलिन करते धरते असून सर्व कायदेशीर- बेकायदेशीर कामे यांच्या संगनमतांनी केली जातात. वर्षानुवर्षे शासकीय नियम डावलून, पद हुद्द्यांवर कायम राहण्यासाठी शासनाची नोकरी करण्यापेक्षा पुढाऱ्यांची चाकरी करणारे अधिकारी व कर्मचारी आहेत.

माहिती अधिकार कार्यकर्ता हक्क अधिकार संरक्षण महासंघाच्या प्रसिद्धीपदी शरद भगत यांची निवड

हे अधिकारी आणि कर्मचारी शासकीय अध्यादेशानुसार बदली करावी व बेकायदेशीर मालमत्ता मिळवल्याची चौकशी करावी, दीर्घकाळ बारामती एमआयडीसीमध्ये कार्यकाळ असल्याने नियम बाहेर केलेल्या कामांचे व नियमबाह्य कामात संरक्षणबाबत दिलेल्या तक्राची तत्काळ दखल घ्यावी. या मागणीसाठी प्रबुद्ध युवक संघटना धरणे आंदोलन करणार आहे. या सर्व अधिकाऱ्यांवर व केलेल्या तक्रारीवर कार्यकारी अभियंता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ बारामती विभाग कारवाई करणार का? अशा प्रश्न सर्व सामान्यांतून विचारला जात आहे.

2 Comments on “बारामती एमआयडीसीमध्ये अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे गोड बंगाल!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *