बारामती, 10 मेः बुलेट मोटरसायकलचे ओरिजनल सायलेन्सर बदलून फटाके फोडणारे किंवा ध्वनीप्रदूषण करणारे सायलेन्सर बाबत बारामती परिमंडळ हद्दीत कारवाईची मोहीम गेल्या काही दिवसांपासून राबविण्यात येत आहे. या कारवाईत 86 बुलेटवर वाहनात बदल केल्याचे मोटार वाहन कायद्याखाली कारवाई करून तब्बल 86 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
बारामती मंडल विभागात बुलेट वाहनांवर झालेल्या कारवाया खालील प्रमाणेः
पोलीस स्टेशन- कारवाईची संख्या- दंड-
1) बारामती शहर – 18 18000
2) बारामती तालुका – 15 15000
3) वालचंद नगर – 11 11000
4) यवत – 10 10000
5) इंदापूर – 07 7000
6) राजगड – 07 7000
7) माळेगाव – 05 5000
8) जेजुरी – 05 5000
9) वडगांव निंबाळकर – 04 4000
10) भिगवण – 02 2000
11) सासवड – 02 2000
12) दौंड – 02 2000
13) भोर – 02 2000
एम. पी. सय्यद यांचा उत्कृष्ट मंडळ अधिकारी म्हणून गौरव
सर्व बुलेट वाहनमालकांनी 8 दिवसात आवाज करणारे किंवा फटफट वाजणारे सायलेन्सर तात्काळ बदलून घ्यावेत, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनात वाहतूक पोलीस परिवहन विभागामार्फत करण्यात आली आहे.
One Comment on “बारामती मंडळ विभागातील बुलेट राजांवर कारवाई!”