बारामती लोकसभा रासप संपुर्ण ताकदीने लढणार

बारामती, 11 सप्टेंबरः राष्ट्रीय समाज पक्षाच्या बूथ प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नुकतीच बारामती येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांच्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी वन बूथ टेन युथ या संकल्पनेवर पक्षाचा विस्तार वाढ प्रत्येक बूथपर्यंत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

बारामतीत राज्य कामगार विमा महामंडळाची आढावा बैठक संपन्न

तसेच आगामी निवडणुकांमध्ये गाफील न राहता सर्व निवडणुका स्वबळावर लडविण्याच्या हेतुने रासप काम करणार आहे. यासह कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावात प्रत्येक बूथवर दहा-दहा माणसे तयार केली पाहिजेत, या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

सदर बैठकीत काही पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. यात ज्येष्ठ नेते पंडीत बापू घोळवे यांनी बूथ रचना बांधणीसंदर्भात कार्यकर्त्यांकडून लेखी आश्वासन घेतले. यासह प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, मुख्य महासचिव माऊली सलगर यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

बावनकुळेंच्या वक्तव्यावर रोहित पवारांचा टोला

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संदिप चोपडे, गिरीधर ठोंबरे, चंद्रकात वाघमोडे, मच्छिंद्र लकडे, शैलेष थोरात, विठ्ठल देवकाते, महादेव कोकरे, दादा भिसे, अरविंद देवकाते, आविनाश मासाळ, अक्षय टकले, संभाजी चव्हाण, शाम घाडगे, किशोर सातकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीत रासप बारामती तालुकाध्यक्ष पदी अ‍ॅड. अमोल सातकर यांची फेर निवड झाली. येत्या काळात बारमती विधानसभा मतदार संघात बुथ यंत्रणा मजबुत राबवून, महादेव जानकर यांना जास्तीत जास्त मताधिक्य कसे मिळेल, यासाठी ताकदीने प्रयत्न करणार आहोत, असे मत अ‍ॅड. अमोल सातकर यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *