बारामतीतील कृषिक 2025 प्रदर्शनाचा यशस्वी समारोप

बारामती, 20 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) बारामतीच्या माळेगाव खुर्द येथील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या कृषिक 2025 प्रदर्शनाचा समारोप आज, सोमवार, दि. 20 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या दहाव्या कृषी प्रदर्शनाने नाविन्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांमुळे गेल्या दहा वर्षातील शेतकरी सहभागाचा उच्चांक गाठला.

विजेत्यांना पारितोषिक प्रदान

कृषिक 2025 च्या समारोपाच्या कार्यक्रमात श्वान, दुग्ध उत्पादन व देशी गोवंश स्पर्धेतील विजेत्यांना ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, हिंदुस्थान फिडचे जनरल मॅनेजर अजय पिसाळ, कृषी विज्ञान केंद्राचे विषय-विशेषज्ञ डॉ. रतन जाधव आणि युवा उद्योजक महेश गुळवे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

स्पर्धांचे निकाल:

श्वान स्पर्धा:

1. टॉय ब्रीड:
प्रथम क्रमांक: आकाश मोरे, शारदानगर (5,000 रुपये आणि ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक)

द्वितीय क्रमांक: अजिंक्य मोरे, शारदानगर (3,000 रुपये आणि ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक)

तृतीय क्रमांक: आदित्य जाधव, बारामती (2,000 रुपये आणि ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक)

2. इंडियन ब्रीड:

प्रथम क्रमांक: अर्जुन आढाव, कटफळ (5,000 रुपये आणि ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक)

द्वितीय क्रमांक: कैलाश किर्वे, बारामती (3,000 रुपये आणि ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक)

तृतीय क्रमांक: आदित्य जाधव, बारामती (2,000 रुपये आणि ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक)

3. वर्किंग ब्रीड:

प्रथम क्रमांक: नकुल शिंदे (5,000 रुपये आणि ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक)

द्वितीय क्रमांक: गौरव नलावडे (3,000 रुपये आणि ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक)

तृतीय क्रमांक: अक्षय दळवी (2,000 रुपये आणि ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक)

देशी गोवंश गाय वर्ग स्पर्धा:

बालाजी केंद्रे, लातूर (लाल कंधारी गाय)

वैभव केंद्रे, लातूर (देवणी गाय)

धनाजी पाटील, राधानगरी, कोल्हापूर (कॉंन्क्रेज गाय)

सन्मान: प्रशस्तीपत्रक आणि ट्रॉफी.

हिरकणी कालवडी स्पर्धा:

प्रथम क्रमांक: रोहित घाडगे, सांगोला (31,000 रुपये आणि ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक)

द्वितीय क्रमांक: केतन शिंदे, अंथुरणे (21,000 रुपये आणि ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक)

तृतीय क्रमांक: सागर चव्हाण, पंढरपूर (11,000 रुपये आणि ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक.

दुग्ध गाय स्पर्धा:

प्रथम क्रमांक: हरीश येडे, येडेवाडी, दौंड (43 लिटर प्रतीदिन – 51,000 रुपये आणि ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक)

द्वितीय क्रमांक: अविरत पानसरे, बारामती (42 लिटर प्रतीदिन – 41,000 रुपये आणि ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक)

तृतीय क्रमांक: गणेश होळकर, सादोबाची वाडी, बारामती (37.6 लिटर प्रतीदिन – 31,000 रुपये आणि ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक)

उत्तेजनार्थ बक्षीस:

अमित शिंदे, उरुळीकांचन यांचा दीड टन वजनाचा रेडा “कमांडो” सन्मानित.

विशेष आभार व आगामी घोषणा:

संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रो. निलेश नलावडे यांनी सर्व सहभागी कंपन्या, स्टॉल धारक, कर्मचारी व शेतकरी बंधू, कृषी विज्ञान केंद्राचेव संस्थेच्या सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे विशेष आभार मानले. त्यांनी कृषिक 2026 चे आयोजन 15 ते 19 जानेवारी दरम्यान होणार असल्याचे जाहीर केले आणि शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *