बारामती, 19 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) बारामतीतील माळेगाव खुर्द येथील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राने कृषिक 2025 प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. हे प्रदर्शन 16 जानेवारीपासून सुरू झाले असून, उद्या याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या कृषिक 2025 प्रदर्शनाला शेतकऱ्यांनी भेट देऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रो. निलेश नलावडे यांनी केले आहे.
कृषिक 2025 या प्रदर्शनाच्या आजच्या दिवशी अनेक (दि.19) यवतमाळचे खासदार संजय देशमुख आणि माजी कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी कृषिक 2025 प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी संस्थेचे विश्वस्त रणजीत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भीमथडी हॉर्स शोचे आयोजन करण्यात आले. या शोमध्ये 51 भीमथडी जातीच्या घोड्यांचा सहभाग होता. यावेळी रिले रेस, पोल बेंडिंग, नर आणि मादी अशा 4 श्रेणींमध्ये विजेत्या 19 घोड्यांना बिकानेर येथील राष्ट्रीय अश्व अनुसंधान केंद्राचे संचालक डॉ. ए. सी. मेहता यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले आहे.
‘कृषिक 2025’ भीमथडी हॉर्स शोचे बक्षीस:
मादी घोड्यांमध्ये:
प्रथम क्रमांक: दत्तात्रय निगुट (पारनेर) – 21,000 रुपये व प्रशस्तीपत्र.
द्वितीय क्रमांक: धनंजय खेडकर (शिरूर) – 11,000 रुपये.
तृतीय क्रमांक: विशाल आहेरराव (नाशिक) – 7,000 रुपये.
नर घोड्यांमध्ये:
प्रथम क्रमांक: सनी जाधव (अहिल्यानगर) – 21,000 रुपये.
द्वितीय क्रमांक: सिद्धार्थ वाणे (अहिल्यानगर) – 11,000 रुपये.
तृतीय क्रमांक: सनी जाधव (अहिल्यानगर) – 7,000 रुपये.
पोल बेंडिंग प्रकारामध्ये:
प्रथम क्रमांक: आफताब नालबंद – 21,000 रुपये.
द्वितीय क्रमांक: रणजीत लांबखडे – 11,000 रुपये.
तृतीय क्रमांक: धनंजय खेडकर – 7,000 रुपये.
रिले रेस प्रकारामध्ये:
विजेते: धनंजय खेडकर, दत्तात्रय निगुट, अशोक आंबेडकर, अतुल खरमाडे.