उजनीचं पाणी बारामती, इंदापूरला मिळणार नाही?

मंगळवेढा, 8 नोव्हेंबरः उजनी धरणाचे एक थेंबही पाणी बारामती आणि इंदापूरला जावू देणार नाही, असे आश्वासन सोलापूरचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले आहे. विखे-पाटील यांच्या भुमिकेने पुन्हा एकदा उजनीच्या पाण्याचा वाद पेटणार की काय? अशी चर्चा होऊ लागली आहे.

आर्थिक दुर्बल घटकांचा आरक्षणाचा मार्ग मोकळा!

मंगळवेढा येथे आवताडे साखर कारखान्यात 6 नोव्हेंबर 2022 रोजी गळीत हंगाम कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री विखे पाटील यांनी उजनीच्या पाण्याच्या संदर्भात भूमिका स्पष्ट केली. उजनीच्या पाण्यावर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हक्क आहे. त्यांच्या हक्काचं पाणी बारामतीसह इंदापूरला कोणत्याही परिस्थितीत जावू देणार नाही, असे विखे पाटलांनी स्पष्ट केले आहे.

बारामतीची बैल जोडी जिल्ह्यात प्रथम

दरम्यान, तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी धरणातून इंदापूरसह बारामती तालुक्यातील दुष्काळी गावांसाठी पाच टीएमसी उपसा सिंचन योजना मंजूर केली होती. या योजनेला सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. शेतकऱ्यांच्या विरोधानंतरही भरणे यांनी योजनेसाठी मोठा निधीही मंजूर केला होता. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता बारामती आणि इंदापूरला उजनीतून‌ एक थेंबही पाणी जावू देणार नसल्याचे पालकमंत्री विखे-पाटील यांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उजनीचे पाणी पेटल्याची चर्चा होऊ लागली आहे.

One Comment on “उजनीचं पाणी बारामती, इंदापूरला मिळणार नाही?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *