बारामती, 07 मे: (अभिजित कांबळे) बारामती शहर व एमआयडीसी परिसरात अवैध गुटखा विक्रीचा व्यवसाय प्रचंड जोमात सुरू असून, या धंद्याला पोलिसांचे कथित वरदहस्त असल्याचा संतापजनक आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शहरातील अनेक टपऱ्यांवर गुटखा खुलेआम विकला जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांना कायद्याची भीती आहे की नाही? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रशांत गांधी यांचे गुटख्याचे गोडाऊन तांदुळवाडी येथे असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच जोगदंड एजंट म्हणून कार्यरत आहे. याशिवाय, शिंदेवाडी हून गायकवाड, मदने, लुनिया, धोत्रे, चव्हाण, वाडकर, मोरे, अभिषेक उमर्धन, कदम, साबळे, केकान व भोसले हे शहरातील विविध भागांमध्ये गुटखा विक्रीत सहभागी असल्याचा आरोप केला जात आहे.
या प्रकारामुळे केवळ जनतेच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण अवैध व्यवहारास पोलीस यंत्रणेचा कथित आशीर्वाद असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे, हे अधिक चिंताजनक आहे.
अवैध धंद्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष
या गंभीर प्रकरणाकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. गुटखा विक्रीचे ठिकाणे, व्यक्ती, व गोडाऊन यांची माहिती स्थानिक पोलीस यंत्रणेला असूनही, अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. हे प्रकार पोलिसांच्या निष्क्रियतेकडे स्पष्टपणे निर्देश करत आहेत. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने आणि संबंधित पोलीस यंत्रणेने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
बारामती तालुका आणि एमआयडीसी परिसरात खुलेआम गुटखा विक्री होत असताना, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई न होणे आश्चर्यकारक आहे. मूग गिळून गप्प बसलेल्या या अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.
पोलीस कारभारावर प्रश्नचिन्ह
शहरात अवैध गुटख्याचा व्यवसाय तेजीत असताना आणि याबाबत स्पष्ट नावे समोर येत असताना, पोलीस यंत्रणा मूग गिळून का बसली आहे? प्रशांत गांधीचे तांदुळवाडीतील गोडाऊन असो, की शहरात सक्रिय असलेले इतर एजंट आणि विक्रेते असोत, यांची माहिती असूनही कारवाई का होत नाही? वसंत नगर, मळद, देसाई इस्टेट आणि इतर भागांतील टपऱ्यांवर सर्रास गुटखा विक्री होत आहे, हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिसत नाही का? गुटखा माफियांना पोलिसांचे छुपे संरक्षण आहे का? गुटखा विक्रीबाबत पोलिसांची “मूक संमती” आहे का? कायद्याचे रक्षकच दोषींना वाचवत आहेत का? कारवाईला टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई कधी होणार? पोलीस गुटखा विक्रीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत का? कायदा फक्त सामान्यांसाठी आणि माफियांवर सूट का? भ्रष्ट पोलिसांची चौकशी कधी होणार? गुटखा विक्रीचं मूक समर्थन करणाऱ्यांना कोण वाचवतंय?
कारवाई करण्याची मागणी
या गंभीर प्रकरणाकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. गुटखा विक्रीचे ठिकाणे, व्यक्ती, व गोडाऊन यांची माहिती स्थानिक पोलीस यंत्रणेला असूनही, अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. हे प्रकार पोलिसांच्या निष्क्रियतेकडे स्पष्टपणे निर्देश करत आहेत. या पार्श्वभूमीवर, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने याप्रकरणी स्वतःहून लक्ष घालणे गरजेचे आहे. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून, दोषी व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तसेच, या अवैध व्यवसायाला पाठबळ देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करणे व त्यांच्यावर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. अन्यथा, कायद्याचे राज्य अबाधित ठेवणे कठीण होईल.
यासंदर्भात थेट पोलिसांचा ‘आशीर्वाद’ असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे या आरोपांची सत्यता तपासण्याची आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नाही का? ‘बुक’ मध्ये नोंदी करून केवळ बघ्याची भूमिका घेणे, हे कोणत्या नियमात बसते?
पोलिसांच्या बदल्या कधी होणार?
बारामती तालुक्यात सध्या अवैध गुटख्याचा धंदा जोमात सुरू आहे. अनेक भागांमध्ये खुलेआम गुटखा विक्री होते आहे, आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जातो आहे. पण याहूनही अधिक धक्कादायक गोष्ट म्हणजे बारामती उपविभाग बीट मधील काही पोलीस अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. सरकारी नियमांनुसार, पोलिसांच्या ठराविक कालावधीनंतर बदल्या होणे आवश्यक आहे. पण बारामतीत हे नियम धाब्यावर बसवले गेले आहेत. त्यामुळे नागरिकांना असा प्रश्न पडतोय की – या पोलिसांच्या बदल्या का होत नाहीत? त्यांच्या बदल्या कधी होणार?
हे अधिकारी त्याच भागात टिकून आहेत आणि त्याच काळात अवैध धंदे वाढले, हे निव्वळ योगायोग मानायचं का? की यात माफिया आणि पोलीस यांचं कुठे तरी गुपित संगनमत आहे? गुटखा विक्रेत्यांची नावं स्पष्ट असतानाही कारवाई का नाही होत? या अधिकाऱ्यांच्या बदल्या थांबवल्या जात आहेत का? जर हो, तर कोणी थांबवल्या? अशा प्रश्नांनी सध्या सामान्य नागरिकांचं मन अस्वस्थ झालं आहे. अवैध धंद्यांना थांबवायचं असेल, तर आधी अशा दोषी पोलिसांवर कारवाई करावी लागेल. त्यांच्याबद्दल चौकशी होणार का? आणि दोषी आढळल्यास त्यांना निलंबित करण्यात येणार का? असा देखील एक प्रश्न आहे. गुटखा माफियांच्या पाठिशी पोलीस उभे राहणार, तर जनतेचं रक्षण कोण करणार? आता वेळ आली आहे – पोलीस बदल्यांचा निर्णय घेण्याची आणि खऱ्या अर्थाने कायदा अंमलात आणण्याची!
गुटख्यासारख्या जीवघेण्या पदार्थांची विक्री खुलेआम होत असताना, आरोग्य आणि कायद्याची पायमल्ली होत आहे. या गंभीर परिस्थितीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची निष्क्रियता संतापजनक आहे. त्यांनी तात्काळ जागे होऊन या अवैध धंद्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह कायम राहील. मूग गिळून बसणे बंद करून आता प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली आहे!