बारामती, 2 एप्रिलः (वृत्त संपादक सम्राट गायकवाड) बारामती सहकारी बँकेला तब्बल 67 कोटी रुपयांचा नफा झाल्याचे बँकेचे चेअरमन यांच्याकडून सांगितले जात आहे. परंतु बारामती सहकारी बँकेकडून फक्त आणि फक्त गोरगरीब जनतेकडून ही वसुली केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच बारामतीमधील बडे व्यापारी व मोठे व्यावसायिक, ज्यांचे राजकीय पुढाऱ्यांबरोबर संबंध असणाऱ्या लोकांची कर्ज वसुली अजिबात होत नसल्याचे समजते आहे.
बारामती सहकारी बँकेने मूल्यांकन पेक्षा जास्त कर्जदाराला कोटींचे कर्ज दिले आहेत. एक-दोन गुंटेवारी वरती सहकारी बँकेने कोटींची कर्ज दिल्याची चर्चा कर्जदार व खातेदारांमध्ये सुरू आहे. त्यामुळे खातेदार बँकेच्या गलथान कारभारावर नाराजी व्यक्त करत आहे. फर्म, संस्था, कंपनी दाखवून त्यांच्यावर कोट्यावधी रुपयांचे कर्ज असून त्याची वसुली मात्र अद्याप चालू नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन रिझर्व बँक ऑफ इंडियाने या आधी बारामती सहकारी बँक (अर्बन बँक) यांना लाखो रुपयांचा दंड ठेवला आहे. बारामती सहकारी बँकेचे लेखापरीक्षण अहवालामध्ये हेराफेरी झाल्याचे रिझर्व बँक ऑफ इंडिया यांनी सांगितल्यामुळे त्यांना दंड ठोठावला आहे. त्यामुळे बँकेचे संचालक मंडळ हे फसवी बातमी पसरवत असल्याचे समजले जात आहे. यावर रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्याकडे खातेदार तक्रार करण्यात असल्याचे सांगितले जात आहे.