बारामती, 21 जुलैः बारामती शहरात गेल्या काही महिन्यांपासून एक महिला प्रतिष्ठीत व्यक्तींच्या घराजवळ येत असंबंध बडबड करीत असे. संबंधित प्रतिष्ठीत व्यक्तीशी भेटण्याची इच्छा संबंधित बंगल्याच्या सुरक्षा गार्डला बोलून करत. त्या महिलेची चौकशी केली असता, ती कोल्हापूर येथून आल्याचे सांगत. मात्र पुर्ण पत्ता सांगत नसत. यामुळे संशय आल्याने संबंधित सुरक्षा गार्डने त्या महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिले. शहर पोलिसांनी महिलेबाबत आणखीन तपास केले असता काहीच माहिती हाती लागली नाही. यामुळे बारामती शहर पोलिसांनी माणुकीच्या नात्याने सदर महिलेला आश्रयासाठी आणि काळजीसाठी बारामती येथील प्रेरणा वसतिगृहात एक महिन्यापासून ठेवले होते. यासाठी वसतिगृहाच्या अधीक्षिका संत मॅडम यांनी मोलाची मदत केली.
मात्र गेल्या महिन्याभरात त्या महिलेच्या वर्तणुकीत कोणताच बदल झाला नाही. यामुळे सदर महिला ही मनोरुग्ण असल्याचा पोलिसांचा आणि अधीक्षिका संत मॅडम यांचा कायस झाला. या कारणाने बारामती शहर पोलिसांनी मंगळवार, 19 जुलै रोजी त्या महिलेला पुण्यातील ससूनमधील मनोरुग्ण विभागात तपासणी केली. तपासणीनंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने सदर महिलेला येरवडा येथील मानसोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. बारामती शहर पोलिसांनी समाजातील कमकुवत वर्गाबाबत सहानुभूतीची भूमिका घेऊन महिला, मुलांना आश्रयाची व काळजीची गरज असल्याने कायदेशीर मार्गाने संबंधित विभागाशी संपर्क ठेवून त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाप्रकारे समाजातील कमकुवत घटक पोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलिसांना त्रास झाला तरीसुद्धा चिडून न जाता पोलीस याबाबत कायदेशीर कारवाई करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस हवालदार निगडे मॅडम, दळवी, पोलीस हवालदार मोरे, महिला पोलीस कर्मचारी कांबळे यांनी केली आहे.