बारामती, 11 डिसेंबरः पुणे जिल्ह्यामध्ये अनेक पोलीस ठाणे हद्दीत मोटरसायकल चोरी जात आहेत. यामुळे त्याचा अभ्यास करून चोरीचा पॅटर्न ठरवून, वेळ ठरवून, त्या ठिकाणी पाळत लावून सदरचे गुन्हे उघड आणण्याबाबत पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत. त्याप्रमाणे बारामती शहर पोलीस ठाणे हद्दीत दुपारच्या वेळेस बारामती येथील मार्केट भागात रेकी करून गस्त करत असताना पोलिसांना एक विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात घेतला. सदर बालकाने दौंड पोलीस ठाणे हद्दीतून एक दुचाकी, भिगवण पोलीस ठाणे हद्दीतून दोन दुचाकी, बारामती शहर पोलीस ठाणे हद्दीतील तीन दुचाकी चोरल्याचे पोलिसांना सांगितले.
महसूल विभागाचा बदल्यातील बेकायदेशीर धंदा!
संशयित विधी संघर्षग्रस्त आरोपीने सदरच्या दुचाकी त्याच्या नातेवाईकांच्या घरी ठेवल्या होत्या, आणि ते विक्रीच्या तयारीत होते. त्या सर्व दुचाकी बारामती शहर पोलीस ठाण्याने जप्त केलेले आहेत. या कारवाईमध्ये दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर 15/ 22, भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर 220/, 22 265/, 22 आणि बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर 583/ 22, 437/ 21 5/22 भादंवि 379 हे गुन्हे उघड केलेले आहेत. तसेच एकूण 3 लाख रुपये किमतीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.
तब्बल 26 ग्रामपंचायतीत एकही बिनविरोध नाही
सदरची कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, प्रकाश वाघमारे, पोलीस अंमलदार रामचंद्र शिंदे, दशरथ कोळेकर, अशोक सीताप, तुषार चव्हाण, दशरथ इंगोले, जामदार शाहू राणे यांनी केली आहे.
One Comment on “बारामती शहर पोलिसांकडून चोरीच्या तब्बल 3 लाखांच्या दुचाकी जप्त”