बारामती, 14 जूनः बारामती तालुक्यातील डोरलेवाडी येथील 30 फाटा येथे गांजा विक्री सुरु आहे, अशी गोपणीय माहिती बारामती शहर पोलीस ठाण्याचे सपोनि कुलदीप संकपाळ यांना मिळाली. या माहितीच्या आधारे, बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप, अभिजीत कांबळे, तुषार चव्हाण, दशरत इंगोले, मनोज, पवार, बंडू कोठे यांनी छापा मारला.
या छाप्यात दोन संशयित आरोपींना 78 हजार किंमतीचा 3 किलो 840 ग्रॅम सुका तयार गांजा रंगेहाथ पकडला. या कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या आदेशान्वये करण्यात आली.
दरम्यान, डोरलेवाडी येथील 30 फाटा येथे संशयित आरोपींपैकी एक छुप्या पद्धतीने गांजा विक्री करत असे. यामुळे डोरलेवाडीसह आसपासच्या परिसरात गांजाची खरेदी विक्री वाढली होती. या कारवाईतील संशयित आरोपींना न्यायाधिश पाटील मॅडम यांच्या न्यायालयात हजर केले असता, त्यांना चार दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात सरकारी वकील राहुल सोनवणे यांनी पोलिसांची बाजू मांडली.