बारामती शहर पोलीस आणि फायर ब्रिगेडने वाचवले युवकाचे प्राण

बारामती, 22 सप्टेंबरः बारामती शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या छतावर एक युवक आत्महत्येच्या प्रयत्न करत असल्याचा फोन शहर पोलिसांना 21 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 10.45 च्या सुमारास आला. घटनेची गंभीर्ता ओळखत पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी ठाण्याच्या बीड मार्शल सह संपुर्ण गुन्हे तपास पथकाला तात्काळ घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिले.

दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहारचा बारामतीत एल्गार

पोलीस पथक घटना स्थळी पोहोचताच त्या ठिकाणी बघ्याची गर्दी जमली होती. सदर युवक हा घरात झालेल्या किरकोळ वादामुळे दारूच्या नशेत आत्महत्या करण्याच्या हेतून पीडीसी बँकेच्या बाजूने स्टेडियमच्या छतावर चढल्याचे पोलिसांना आसपास चौकशी केल्यानंतर समजले. तपासात दिनेश मिसाळ (वय 22, रा. आमराई) असे या छतावर चढलेल्या युवकाचे नाव पोलिसांना समजले.

बानपचा दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतला मागे

पोलिसांनीही सदर परिस्थिती अतिशय कौशल्याने हाताळून पोलीस मित्र, समाजसेवक यांच्या मदतीने युवकाला खाली उतरण्यासाठी भावनिक आवाहन केले. मात्र दारूच्या नशेमुळे त्या युवकाला खाली परत उतरणे अवघड झाले होते. तोल गेला असता तर मोठी दुर्घटना होण्याची मोठी शक्यता होती. यामुळे पोलिसांनी तात्काळ फायर ब्रिगेडला पाचारण केले होते. फायर ब्रिगेड घटनास्थळी पोहोचताच उंच सीडीच्या सहाय्याने सदर युवकास मोठ्या शर्तीने खाली उतरवले. या घटनेचा रात्री मोठ्या थरार नाट्यानंतर चांगला शेवट झाल्याचे जमलेल्या गर्दीकडून सांगण्यात येत आहे.

सदर युवकास वाचविण्याची कारवाई बारामती शहर पोलीस पथक आणि फायर ब्रिगेड टीम यांनी एकत्रितरित्या केली. यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, दशरथ कोळेकर, तुषार चव्हाण, पोलीस कर्मचारी शेख, पोलीस नाईक शिंदे, देवकर यांनी शर्तीचे प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *