बारामती, 27 ऑगस्टः बारामती शहरातील कॉलेज, शाळा परिसरात अनेक अल्पवयीन मुलं विनाकारण अतिवेगात फिरतात. त्यामुळे अनेकदा जा ये करणाऱ्या वाहनांना, पायी जाणाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. तर कधी वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागतो. यामुळे बारामती शहर पोलिसांच्या पथकाने शहरातील कॉलेज, शाळा परिसरात पुन्हा कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
जिल्हाध्यक्षपदी रत्नप्रभा साबळे तर जिल्हा कार्याध्यक्षपदी रविंद्र सोनवणे यांची एकमताने निवड
महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार ज्यांच्याकडे वाहन परवाना नाहीत, त्यांच्यावर वाहतूक कायदा अन्वये शहर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. सदर कारवाई बारामती शहरातील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय परिसरात करण्यात आली.