बारामती, 7 नोव्हेंबरः पूर्वा केमटेक प्रा. लि. आणि बसवंत गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने सेवर- ग्रोवर बैलजोडी स्पर्धा नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत बारामती तालुक्यातील सुपे येथील सुरेश चिपाडे यांचा पुणे जिल्हात प्रथम क्रमांक आला आहे. तर महाराष्ट्रात तिसरा क्रमांक मिळाला आहे. राज्यातील सर्वच विभागातून शेतकरी बंधू- भगिनी तसेच विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील विजेत्यांसाठी प्रत्येकी पाच हजार रोख, पारितोषिक व प्रशिस्तीप्रत्रक सन्मानपत्र देण्यात आले.
बारामतीत कापसाची आवक वाढली!
सेवर – ग्रोवर बैलजोडी स्पर्धा शेती जगातील सर्वात मोठा जिवंत रंगमंच आहे. बळीराजा हा या रंगमंचावरील सर्वोत्कृष्ट कलाकार आहे. काळ्या मातीतून सोनं पिकवणाऱ्या या बळीराजाच्या काबाड कष्टांना साथ देतात ते त्याचे लाडके सर्जा-राजा अर्थातच त्याची बैलजोडी. या सर्जा राजांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा उत्सव बैलपोळा सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या बळीराजाशी पूर्वाचेही सलोख्याचे नातं आहे. त्यामुळे त्याचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी पूर्वा केमटेक प्रा. लि. आणि बसवंत गार्डन यांचे संयुक्त विद्यमाने शेतकरी बांधवांसाठी या सेवर ग्रोवर बैलजोडी स्पर्धाचे आयोजन केले होते. ही स्पर्धा जिंकल्यानंतर चिपाडे यांनी पुर्वा स्पर्धा आयोजकांचे आभार मानाले.
जेजुरी- बारामती मार्ग बनला अपघातांचा सापळा
One Comment on “बारामतीची बैल जोडी जिल्ह्यात प्रथम”