बारामतीतील मुलांचे राष्ट्रीय स्तरावरील ब्लॅक बेल्ट डिग्री मध्‍ये मोठे यश

बारामती, 13 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) बारामतीतील 4 मुलांनी कराटेमध्ये मोठे यश मिळवले आहे. राष्ट्रीय स्तरावरील युनिक स्पोर्ट्स अँड शोतोकान कराटे डो असोसिएशन इंडियाच्या बारामती ब्रँचमधील 4 मुलांनी कराटेमध्ये राष्ट्रीय स्तरावरील ब्लॅक बेल्ट फर्स्ट डिग्री परिक्षेत उत्तीर्ण होऊन बारामतीच्या वैभवात शिरपेच लावला आहे. आरोही गणेश जगताप, स्वामिनी विक्रम घाडगे, शिवराज मंदार शेरे आणि शिवम अनिल कदम यानी कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट फर्स्ट डिग्री संपादन केली आहे. ही सर्व मुले बारामतीच्या श्रीरामनगर येथील आहेत. या सर्व मुलांचे सध्या बारामती पंचक्रोशीतून कौतुक केले जात आहे.

या मुलांनी लहान वयातच कराटेचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली

दरम्यान, या 4 मुलांमध्ये आरोही गणेश जगताप ही सर्वात लहान आहे. आरोहीने वयाच्या अडीच वर्षापासून कराटेचे प्रशिक्षण घेण्यास सुरूवात केली होती. तर बाकीचे मुले देखील वयाच्या चौथ्या वर्षापासून कराटेचे प्रशिक्षण घेत आहेत. या संदर्भातील माहिती युनिक स्पोर्ट्स अँड शोतोकान कराटे डो असोसिएशन इंडिया संस्थेचे प्रमुख शिहान गणेश भिमराव जगताप यानी दिली आहे. या सर्व मुलांनी इतक्या लहान वयातच घेतलेल्या मेहनतीमुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावरील कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट फर्स्ट डिग्री मिळवता आली आहे.

कराटेमध्ये ISO मानांकन मिळवणारी बारामती मधील पहिली संस्था

तत्पूर्वी, युनिक स्पोर्ट्स अँड शोतोकान कराटे डो असोसिएशन इंडिया ही बारामती मधील आय. एस. ओ मानांकन मिळवणारी कराटे या क्रीडा प्रकारातील पहिली संस्था आहे. या संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या बारामतीतील अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय व राज्यस्तरावर खेळताना अनेक पदकांची कमाई केली आहे. दरम्यान, बारामतीतील ही 4 मुले कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट फर्स्ट डिग्री परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांना बारामती नगरपरिषदेचे मा उप नगराध्यक्ष बाळासाहेब जाधव, बिरजुभैय्या मांढरेे, ॲड. सूरज बनकर, ॲड. गणेश कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते रतिलाल मासाळ, ॲड. सुनिलभाऊ शिंदे, विकास गुळुमकर सर, अतुलशेठ गोटे आणि प्रशांत गाढवे यानी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *