बारामती, 01 नोव्हेंबर: बारामती विधानसभा 201 मतदार संघामध्ये निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये उमेदवार वैध की अवैध ठरवताना केलेल्या छाननी प्रक्रियेमध्ये अपक्ष उमेदवार अभिजीत कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र श्रीनिवास पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार अजित अनंतराव पवार यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. युगेंद्र पवार यांनी यांनी काटेवाडी येथील जागेतील कोट्यावधी रुपये खर्च करून राहत्या घराचा उल्लेख प्रतिज्ञा पत्रावर केला नाही. तसेच विविध कंपनीमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा आर्थिक उल्लेख केला नसल्यामुळे त्यांच्यावर पुराव्यासहित लेखी हरकत अपक्ष उमेदवार अभिजीत कांबळे यांनी केली आहे.
https://youtu.be/M8342l8AVMI?si=0-wJn4JFWCblcyiB
यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे उमेदवार अजित अनंतराव पवार यांचे सहयोग येथील आलिशान बंगल्याचे बांधकाम मंजूर नकाशा प्रमाणे बांधकाम न करता बंगल्याची किंमत दिशाभूल करणारी दाखविली आहे. बारामती नगरपरिषदेमध्ये सहयोग मधल्या बंगल्याची नोंदणी वेगळी असून मंजूर बांधकाम वेगळे आहे. बारामती नगर परिषदेत एवढ्या मोठ्या बंगल्याची घरपट्टी 14000 रुपये इतकी कमी दर्शवली जाते. तसेच लोणीकंद येथील त्यांच्या गोडाऊनच्या जागेवर बारामती सहकारी बँक बारामती यांचे अनुक्रमे 8 कोटी व 12 कोटी रुपये एवढे कर्ज आजही सातबाराला दिसत असून ते कर्ज अजित दादा पवार यांनी प्रतिज्ञापत्रांमध्ये दर्शवले नसल्याची लेखी तक्रार अपक्ष उमेदवार अभिजीत महादेव कांबळे यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांचे उमेदवार अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनिता पवार यांच्या नावे सहभाग असलेल्या विविध कंपन्यांची आर्थिक माहिती अजित आनंदराव पवार यांनी आपल्या प्रतिज्ञा पत्रामध्ये उल्लेख केला नसल्याचे अपक्ष उमेदवार अभिजीत कांबळे यांनी केली आहे. या तक्रारीवर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक कलम 26 अन्वये कारवाई करण्यास असमर्थता दर्शवली असून याबाबत योग्य त्या न्यायालयात दाद मागण्याचा आदेश दिला आहे.
याबाबत अभिजीत कांबळे यांनी विचारले असता, या आदेश विरोधात निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडे दाद मागितली असून माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका लवकर दाखल करण्याचे सांगितले आणि योगेंद्र श्रीनिवास पवार व अजित आनंदराव पवार यांचे उमेदवार अर्ज उच्च न्यायालयाच्या आदेशाने बाद होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.