पुणे, 9 ऑक्टोबरः मुलींचा जन्मदर कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भोर तालुक्यातील दुर्गम, डोंगराळ भागातील 104 गावांमध्ये मुलींच्या जन्माचे प्रमाण सर्वाधिक आढळले आहे. याउलट मुलींचा जन्मदर सर्वांत कमी हवेली तालुक्यातील 24 गावांमध्ये असल्याचे दिसून आले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण आणि आरोग्य विभागाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर निश्चित करण्यासाठी 0 ते 6 वर्षे वयोगटातील मुला-मुलींचे केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली.
बारामतीतील कार्यक्रमाला प्रा. जोगेंद्र कवाडे लावणार हजेरी
जिल्ह्यात 2011 च्या जनगणनेतील सरासरीच्या तुलनेत सरासरी 58 ने वाढ झाली आहे. जिल्ह्यातील 686 ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील मुलींच्या जन्माच्या प्रमाणात दर हजारी मुलांच्या प्रमाणात 948 हून अधिक वाढ झाली आहे. तर काही ग्रामपंचायतींनी 960 चा आकडा ओलांडला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील भोर, खेड, जुन्नर, आंबेगाव, बारामती आणि इंदापूर या तालुक्यांमध्ये मुलींच्या जन्मदराचे प्रमाण इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिक आहे.
इंदापुरात रासपचे शक्ती प्रदर्शन
‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ या अभियानांतर्गत करणयात आलेल्या सर्वेक्षणात मुला-मुलींच्या प्रमाणानुसार गावे आणि तालुक्यांचे तीन गटांत वर्गीकरण केले. यात मुलींच्या दर हजारी मुलांमागील जन्माच्या प्रमाणाचे देश आणि राज्याच्या सरासरीशी तुलना केली आहे. यानुसार राज्याच्या सरासरीपेक्षाा कमी संख्या असलेल्या ग्रामपंचायतींची गणना ही अतिजोखमीच्या गटात आणि सरासरीपेक्षाा अधिक संख्या असलेल्या ग्रामपंचायती सर्वसाधारण आणि 948 हून अधिक प्रमाण असलेल्या ग्रामपंचायती या सर्वोत्कृष्ट म्हणून ग्राह्य धरल्या आहेत.