बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीत उडीदाला उच्चांकी दर मिळाला

बारामती, 22 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये उडीदाला उच्चांकी दर मिळाला आहे. 19 सप्टेंबर 2024 रोजी बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य यार्डात उडीदास प्रति क्विंटल 7 हजार 752 रुपये असा उच्चांकी दर मिळाला आहे. त्याचवेळी उडीदाला सरासरी प्रति क्विंटल दर 7 हजार 251 असा दर निघाला आहे. तसेच यावेळी 740 क्विंटल इतकी आवक झाली आहे. तर पिवळ्या मुगाला प्रति क्विंटल 14 हजार 100 रुपये इतका दर आणि हिरव्या मुगाला 7 हजार 200 इतका दर मिळाला आहे.



बारामती बाजार समितीमध्ये सध्या पुरंदर, फलटण, बारामती, इंदापूर, दौंड तसेच सोलापूर जिल्ह्यातील काही भागातून उडदाची आवक होत आहे. त्याच बरोबर गहू, गावरान ज्वारी, बाजरी, मुग आणि हरभरा या शेतमालाची आवक होत आहे. येत्या काही दिवसात बाजरी आणि मका या शेतमालाचा काढणी हंगाम सुरू होत असल्याने शेतकऱ्यांनी आपला माल स्वच्छ व वाळवून आणावा, असे आवाहन बारामती बाजार समिती तर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *