मान्यवरांच्या हस्ते श्री अष्टविनायक गणेशोत्सवात बाप्पांची आरती!

बारामती, 10 सप्टेंबरः देशभरात गणेशोत्सव मोठ्या भक्तीभावात आणि थाटात साजरा होत आहे. एकीकडे लाडक्या गणपती बाप्पांसाठी विविध गणेश मंडळांनी विविध थिमनुसार देखावे सजविल्याचे चित्र आहेत. तर दुसरीकडे बारामती शहरातील वसंतनगर येथील श्री अष्टविनायक गणेशोत्सव मंडळाद्वारे दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या थाटात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.

दररोज शहरातील विविध प्रतिष्ठीत मान्यवरांच्या हस्ते लाडक्या गणपती बाप्पांची आरती करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून 9 सप्टेंबर रोजी बारामती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश बांदल व युवा नेते सयाजी गायकवाड यांच्या हस्ते श्रींच्या आरतीचा मान मिळाला. यावेळी आलेल्या मान्यवरांनी मंडळाचे कौतुक केले व त्यांना सनमान पत्र देऊन मंडळातर्फे सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी मंडळाचे आधारस्तंभ ओंकार जाधव, मंडळाचे अध्यक्ष गौरव जाधव, उपाध्यक्ष बबलू दास, कार्याध्यक्ष फयजान खान, सचिव ऋतिक कांबळे, उपकार्याध्यक्ष, ओंकार जाधव हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *