बारामती, 19 जुलैः (प्रतिनिधी- साजन पवार) बारामती शहरातील सकल जैन समाजच्या वतीने जैन मुनीं यांच्या हत्येच्या निषेधार्थ दुकान बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत बारामतीतील सर्व जैन समाज उद्या त्यांची त्यांची दुकाने बंद ठेवणार आहेत.
वसुली एजेंटच्या त्रासाला कंटाळून दाम्पत्याची आत्महत्या!
दरम्यान, कर्नाटकच्या बेळगांव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यामधील हिरेकुडी गावात जैन मुनीं आचार्य श्री 108 कामकुमारनंदी महाराज यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. या हत्येच्या निषेधार्थ सकल जैन समाजाने एकत्रित येत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे बारामतीमधील जैन समाजातील व्यापारी वर्गानेदेखील उद्या 20 जुलै 2023 रोजी आपापली दुकाने बंद ठेवून जैन मुनींच्या हत्येचा निषेध नोंदविणार आहेत.
अजित पवारांच्या वाढदिवसाच्या बॅनर्सवरून शरद पवारच गायब!
2 Comments on “उद्या बारामतीमधील जैन समाजाकडून बंदचे आवाहन”