मुंबईत फटाके फोडण्यावर निर्बंध घाला – मुंबई हायकोर्ट

बदद्लापूर आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण

मुंबई, 6 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) दिवाळीचा सण आता जवळ आला आहे. त्यामुळे अनेक लोक सध्या दिवाळीची खरेदी करण्यामध्ये व्यस्त आहेत. अशातच मुंबईत राहणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. मुंबई आणि मुंबई महानगर परिसरात आता फटाके फोडण्यावर निर्बंध घालण्यात यावेत, अशा सूचना मुंबई हायकोर्टाने महानगरपालिकेला दिल्या आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी सध्या हवेची गुणवत्ता खराब झाल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई हायकोर्टाने हा निर्णय घेतला आहे.

मुंबईत राहणाऱ्या लोकांना महानगरपालिकेने रात्री 7 ते रात्री 10 या कालावधीनंतर फटाके फोडण्यास बंदी घालावी, असे कोर्टाने म्हटले आहे. तसेच या सूचनेवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, असे निर्देश देखील मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत मुंबईकरांना केवळ तीनच तास फटाके फोडता येणार आहे. मुंबईतील खालावत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेबाबत एका जनहित याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांकावर तातडीने लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत.

बांगलादेश-श्रीलंका सामन्यात वाद; शाकीबच्या कृतीवर प्रश्न उपस्थित

यावेळी सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती कुलकर्णी यांनी म्हटले की, “आपल्याला आता निवड करावी लागेल. एकतर आपल्यात रोगमुक्त वातावरण पाहिजे किंवा आपण फटाके फोडून सण साजरा केला पाहिजे. या संदर्भात राज्य सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे. आपण केवळ निसर्गावर अवलंबून राहू शकत नाही.” त्यामुळे प्रशासन यासंदर्भात कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काटेवाडीत अजित पवार गटाने मारली बाजी

याशिवाय हायकोर्टाने मुंबईतील वायू प्रदूषणाची स्थिती पाहता, मुंबईतील सर्व बांधकामे दिवाळीपर्यंत थांबविण्याचे निर्देश देखील दिले आहेत. यासोबतच पुढील तारखेला हवेची गुणवत्ता कमी न केल्यास न्यायालय बांधकाम साहित्याच्या वाहतुकीवर देखील बंदी घालण्याचा विचार करू शकते, असे कोर्टाने यावेळी म्हटले आहे. तसेच विकासकामांपेक्षा लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. काही दिवस बांधकाम थांबले तर आभाळ कोसळणार नाही, असेही मुंबई हायकोर्टाने म्हटले आहे. तर या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

One Comment on “मुंबईत फटाके फोडण्यावर निर्बंध घाला – मुंबई हायकोर्ट”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *