नितेश राणे यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट

मुंबई, 22 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) भाजप आमदार नितीश राणे यांच्याविरोधात कोर्टाने जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला होता. त्यावर मुंबईच्या माझगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीला नितेश राणे गैरहजर होते. त्यामुळे न्यायालयाने नितेश राणे यांना 15 हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले. तर गेल्या सुनावणीवेळी कोर्टाने नितेश राणे यांना याप्रकरणी समन्स बजावून कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले होते.

खोट्या जाहिराती बंद करा! रामदेव बाबांना कोर्टाने फटकारले

तत्पूर्वी, नितेश राणे यांनी या वर्षी मे महिन्यात संजय राऊत यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यावेळी नितेश राणे यांनी राऊत यांना साप म्हटले होते. तसेच संजय राऊत हे 10 जून 2023 पर्यंत उद्धव ठाकरेंना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावा नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यांचा हा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी पक्षाने फेटाळून लावला होता. त्यानंतर संजय राऊत यांनी याप्रकरणी नितेश राणे यांच्या विरोधात तक्रार केली होती. तसेच त्यांनी यामध्ये नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

शिवराज राक्षे ठरला 65 वा महाराष्ट्र केसरी

याप्रकरणी आता माझगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीला नितेश राणे आणि त्यांचे वकील उपस्थित नव्हते. नितेश राणे हजर न राहिल्याने माझगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने त्यांच्या विरोधात 15 हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. तर याप्रकरणाची पुढील सुनावणी 15 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीला नितेश राणे हे उपस्थित राहणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

One Comment on “नितेश राणे यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *