भिवंडी येथील हत्येच्या निषेधार्थ बारामतीत बहुजन समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन

बारामती, 27 फेब्रुवारीः भिवंडी शहरात एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून त्यास जबर मारहाण केल्याची घटना 14 फेब्रुवारी रोजी घडली होती. या घटनेत तो जखमी झाला होता. मात्र, या मुलाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. संकेत भोसले असे या 16 वर्षीय मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. सध्या या घटनेतील आरोपींना अटक करण्याची मागणी समाजमाध्यमांकडून केली जात आहे. या मुलाच्या हत्येच्या निषेधार्थ, बारामती शहरात बहुजन समाजाच्या वतीने 29 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.



ही घटना आपल्या पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रासाठी अतिशय लाजिरवाणी असून, या घटनेतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व पिडीत कुटुंबाला न्याय द्यावा. या मागणीसाठी बहुजन समाजाच्या वतीने येत्या 29 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता बारामती शहरातील बुध्द विहार सिध्दार्थ नगर महात्मा फुले नगर सुहास नगर चंद्रमणी नगर – आंबेडकर पुतळा मार्गे – इंदापुर चौक गुणवडी चौक गांधी चौक – सुभाष चौक तसेच भिगवण चौक बारामती नगरपरिषदेच्या समोर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या मोर्चात बारामती शहर तालुक्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बहुजन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *