बारामती, 15 जानेवारीः बारामती शहरासह तालुक्यातील एकमेव असलेला मैदान भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमची दुरवस्था झाल्याचे चित्र आहे. या मैदानाची देखभालीची कुठलीही जबाबदारी कोणीही घेण्यास तयार नाही. सदर खेळाच्या मैदानावर कुठलीही सुरक्षा यंत्रणा नसून अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. तसेच छत कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासह हे मैदानाकडे दुर्लक्ष झाल्याने अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले आहे.
दरम्यानच्या काळात बारामती नगरपालिकेच्या ठेकेदाराकडून ठेका काढण्यासंबंधी अनेक आंदोलने झाली. परंतु सदर ठेकेदारावर राजकीय अभय असल्याने मुदत संपल्यावर ही नियमबाह्य ठराव करून ठेका चालू ठेवण्याची संबंधीकडून ठराव करण्यात आला आहे. सदर ठेकेदाराकडून लाखो रुपये थकबाकी असताना सदर ठेकेदाराला अभय का? असा प्रश्न क्रीडा प्रेमींमध्ये उपस्थित झाला आहे.
सदर स्टेडियमचे नाव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असल्याने स्टेडियमकडे जातीय द्वेषातून एवढे मोठे मैदान का दुर्लक्षित केले जात आहे? असा आरोप आंबेडकरी समाज करीत आहे. या दुरावस्थेच्या विरोधात बारामतीमध्ये प्रबुद्ध युवक संघटना चे अध्यक्ष अभिजीत कांबळे आंदोलन करणार आहे.
‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असणाऱ्या स्टेडियमचे हेळसांड करणाऱ्या गटनेत्या विरोधात तीव्र आंदोलन करणार आहे- अभिजीत कांबळे
सदरील स्टेडियममधील असणाऱ्या व्यायामाच्या साहित्याची फिटींग करून तसेच मॅट आणि आरसे बसवून जिम सर्व सामान्यांसाठी खुली करण्यात यावी. या मागण्यासाठी येणाऱ्या काळात बारामती नगरपालिका प्रशासन विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहे.- रविंद्र (पप्पू) सोनवणे, युवक कार्याध्यक्ष पुणे जिल्हा आरपीआय (आठवले)
बारामतीत मोटरसायकल चोरांची टोळी गजाआड
सदर स्टेडियमला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम नाव सोडून जर बारामतीतील स्थानिक आमदार व खासदार यांचे नाव किंवा त्यांच्या घरातील व्यक्तींचे नाव असते, तर स्टेडियमची दुरवस्था झाली असती का? असा प्रश्न समोर येत आहे. वास्तविक पाहता स्टेडियमला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव असल्याने त्याची दुरवस्था तर होत नाही ना? स्टेडियमवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सामने आणि मोठ्या प्रमाणात स्पर्धा खेळवल्या जातात. त्या स्पर्धा युट्युब या प्रसार माध्यमातून संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध होत असतात. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची बदनामी तर होत नाही ना? यासह जाणून-बुजून स्टेडियममध्ये प्रवेश करताना जिथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव लिहिले आहे, तेथे नावाची सुद्धा मोडतोड झाली आहे. त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे प्रबुद्ध युवक संघटना यांच्यामार्फत आंदोलन करणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष सम्राट अशोक गायकवाड यांनी सांगितले.
बारामती जिंकण्याआधीच भाजपमध्ये अंतर्गत कलह
One Comment on “बारामतीमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमची दुरवस्था”