पुढील महापरिनिर्वाण दिनापर्यंत बाबासाहेबांचे स्मारक उभारण्यात येईल, फडणवीसांची अपेक्षा

मुंबई, 06 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. “पुढच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत इंदू मिलवरील बाबासाहेबांचे स्मारक उभारण्यात येईल,” अशी अपेक्षा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. याप्रसंगी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दीपक केसरकर, विविध मान्यवर आणि अनुयायी उपस्थित होते.



यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महाकारूनी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मी मानवंदना अर्पित करतो. आज भारत अतिशय वेगाने प्रगती करतोय. भारताची जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी भारत अर्थव्यवस्था होणार आहे. याचे श्रेय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला जाते. या संविधानाने देशामध्ये सकल बहुजनांना न्याय देण्याची व्यवस्था उभी केली. त्यामुळे खऱ्या अर्थाने देशाच्या मुख्य धारेमध्ये समाजातील सर्व लोकं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आले. म्हणूनच आज ही प्रगती आपण बघत आहोत.”

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1732237517360136486?s=19

“आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील त्याचा उल्लेख केला आहे की, मला कोणत्याही धर्मग्रंथापेक्षाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान अधिक महत्त्वाचे आहे. हे संविधानच भारताला प्रगतीपथावर नेऊ शकते. हे संविधान तयार करत असताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याठिकाणी समता आणि बंधुता हे जे गौतम बुद्धांनी सांगितलेल्या तत्त्वाच्या आधारावर भारताचे संविधान तयार केले. म्हणूनच आज आपण पाहतोय. आज आपण शांतीच्या मार्गावर चालून देखील जगामध्ये आपली आगळी वेगळी प्रतिमा उभी झाली आहे.” असे ते यावेळी म्हणाले.

बाबासाहेबांच्या स्मारकाच्या कामाला निधीची कमतरता भासणार नाही – अजित पवार

“डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात अर्थतज्ज्ञ म्हणून तसेच अनेक मंत्री म्हणून केलेले काम असेल ते भारताच्या निर्मितीचे पहिले पाऊल ठरले आहे. म्हणूनच आपण त्यांना महामानव म्हणतो. कारण जिथे लोकांचे किंवा तज्ञांचे विचार संपतात, तिथे बाबासाहेबांचे विचार सुरू होत असे. त्यामुळेच आज देशाच्या वाटचालीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

जगाला हेवा वाटेल असे बाबासाहेबांचे स्मारक उभारणार – मुख्यमंत्री शिंदे

“गेली अनेक वर्षे इंदू मिलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे, अशी मागणी सुरू होती. त्यासाठी बरीच आंदोलने झाली. मला ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही विनंती केली. त्यानंतर इंदू मिलची जागा आपल्याला मिळाली. आता इंदू मिलवर बाबासाहेबांच्या भव्य स्मारकाचे निर्माण होत आहे. मला अपेक्षा आहे की, पुढच्या महापरिनिर्वाण दिनाला आपल्याला त्याठिकाणी अभिवादन करता आले पाहिजे. हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.” असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

“तसेच आपण दीक्षाभूमीवर 200 कोटी रुपयांची विकासकामे सुरू केली आहेत. दीक्षाभूमी ही जागतिक दर्जाची वास्तू झाली पाहिजे, कारण दीक्षाभूमी ही केवळ भारतासाठी महत्वाची नाही, तर तेथे जगभरातून पर्यटक येत असतात. या पार्श्वभूमीवर, दीक्षाभूमी येथील विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच बाबासाहेबांचे जागतिक नेतृत्व आज जगातील सर्व देश स्विकारत आहेत, ही देखील महत्त्वाची गोष्ट आहे.” असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

One Comment on “पुढील महापरिनिर्वाण दिनापर्यंत बाबासाहेबांचे स्मारक उभारण्यात येईल, फडणवीसांची अपेक्षा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *