लाहोर, 15 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) पाकिस्तान क्रिकेट संघाबाबत महत्त्वाची बातमी आहे. बाबर आझमने पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे, बाबर आझमने तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. यंदाच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील लाजिरवाण्या कामगिरीमुळे त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान इम्रान खाननंतर बाबर हा पाकिस्तानचा दुसरा यशस्वी कर्णधार आहे. बाबर आझमने आतापर्यंत 134 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाचे नेतृत्व केले आहे. यामध्ये पाकिस्तानने 78 सामन्यांत विजय मिळवला, तर 44 सामन्यांत त्यांचा पराभव झाला आहे.
— Babar Azam (@babarazam258) November 15, 2023
पाकिस्तान संघ विश्वचषक 2023 च्या साखळी फेरीतून बाहेर पडला आहे. पाकिस्तानने साखळी फेरीतील 9 पैकी फक्त 4 सामने जिंकले होते. त्यामुळे पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर होता. दरम्यान, संघाच्या या कामगिरीनंतर बाबरने आज कर्णधारपद सोडल्याची घोषणा केली. यासंदर्भात त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. आज मी तिन्ही फॉरमॅटमधील पाकिस्तानी संघाचे कर्णधारपद सोडत आहे. मात्र, आपण तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळाडू म्हणून खेळत राहणार असल्याचे त्याने सांगितले आहे.
विराट कोहलीचे 50 वे शतक; सचिनचा विक्रम मोडला
यावेळी त्याने लिहिले की, “मला तो क्षण चांगला आठवतो जेव्हा मला 2019 मध्ये पीसीबीकडून पाकिस्तानचे नेतृत्व करण्यासाठी सांगितले. गेल्या 4 वर्षांत मी मैदानावर आणि मैदानाबाहेर अनेक चढ-उतार पाहिले आहेत. मी माझ्या पूर्ण समर्पणाने क्रिकेट जगतात पाकिस्तानचा अभिमान कायम ठेवण्याचे ध्येय ठेवले आहे. पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये नंबर-1 स्थानावर पोहोचणे हे खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापनाच्या सामूहिक प्रयत्नांतून शक्य झाले. या प्रवासात पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी दिलेल्या अतुट पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो. आज मी तिन्ही फॉरमॅटमधील पाकिस्तानी संघाचे कर्णधारपद सोडत आहे. हा एक कठीण निर्णय आहे पण मला वाटते की हा निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ आहे. मी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळाडू म्हणून पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करत राहीन. नवीन कर्णधार आणि संघाला माझा पूर्ण पाठिंबा असेल. मला ही महत्त्वाची जबाबदारी दिल्याबद्दल मी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचाही आभारी आहे.”
बस अपघातात 36 प्रवासी ठार; 19 जखमी
One Comment on “बाबर आझमने पाकिस्तानच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला”