बानप कंत्राटी कामगारांचा ठिय्या

बारामती, 12 ऑगस्टः बारामती नगर परिषदेच्या कंत्राटी कामगारांनी आज, 12 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 च्या सुमारास नगर परिषदेच्या गेट समोर ठिय्या करून बसले. सदर ठिय्या हा कामगार नेते अभिजीत कांबळे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. सदर ठिय्याच्या वेळी बारामती नगर परिषद आणि ठेकेदार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

पवार-सुळे कुटुंबियांकडून रक्षाबंधन साजरा; व्हिडीओ व्हायरल

बारामती नगर परिषदेच्या कंत्राटी कामगारांवर गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक पिळवणूक होत असल्याची गंभीर बाब अभिजीत कांबळे यांनी उघडकीस आणून दिली. बारामती नगर परिषदेच्या हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून विविध कामांसाठी कंत्राटी कामगारांकडून अनियमित वेळेत काम करून घेतले जात आहे. सदर कंत्राटी कामगारांकडून ठेकेदार आणि बारामती नगर परिषदेकडून कामगार कायद्याची पायमल्ली करत शोषण केले जात असल्याचेही अभिजीत कांबळे यांनी यावेळी कंत्राटी कामगारांना सांगितले. यावेळी महिला आणि पुरुष कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *