बारामती, 6 जूनः बारामती नगरपरिषदेने निवडणूक प्रभाग रचनेत जाणीवपुर्वक अन्याय केला आहे. या अन्यायाविरोधात उपाययोजना करण्यासाठी 5 जून 2022 रोजी संध्याकाळी भरपावसात बैठक संपन्न झाली. या बैठकीत सुजय रणदिवे व नंदू खरात यांनी अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या कामासंबंधी न झालेला पाढा वाचला. तर साठे नगरमध्ये आजपर्यंत शौचालयाचे काम अपूर्ण असल्याचे सांगितले. सुजय रणदिवे यांनी गेल्या 50 वर्षात मातंग समाज मंदिर झालेच नाही, असे सांगून नेतृत्वाबद्दल आक्षेप नोंदवला.
अनिकेत मोहिते यांनी बैठकीचे आयोजन का व कशासाठी केले, आताच का ही बैठक घेण्याचे कारण आहे, याचे विस्तारित विवेचन केले. ते पुढे म्हणाले की, पक्ष, समाज व धर्मविरहित एक यासाठी सर्वस्व देण्याची तयारी आहे. प्रभाग रचनेमुळे समाजामध्ये गुलाम प्रतिनिधी तयार करण्याचे षडयंत्र आहे. या षडयंत्राला अनुसूचित जातीच्या तरूणांनी बळी पडू नये, सर्वोत्तम त्याग करून हे आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन अनिकेत मोहिते यांनी या बैठकीत केले.
गेल्या 15 वर्षांमध्ये अनुसूचित जातीच्या प्रभागात नगर परिषदेच्या माध्यमातून एकही वास्तु दाखवण्यासारखी बांधण्यात आलेली नसल्याचे अभिजीत कांबळे यांनी सांगितले. तसेच या वास्तूंचा पैसा कुठे जातो? तसेच अर्थ संकल्पातील अनुसूचित जातीचा निधी सवर्ण विभागाकडे वळवल्याचे अभिजीत कांबळे यांनी पुराव्यांनिशी स्पष्ट केले.
युवकांचा सहभाग अधिकाधिक वाढवण्यासाठी अनुसूचित जाती विभाग संपर्क साधण्याचे अभियान छेडणार असल्याचे भास्कर दामोदर यांनी सांगितले. चेतन गालिंदे यांनी स्मारक पुतळा येथील आयोजित बैठक ऐन पावसामुळे माता रमाई भवन येथे घेतल्यामुळे आयोजकांचे आभार मानले. या बैठकीला विविध जाती-धर्माचे व पक्षाचे सदस्य उपस्थित असल्याचे योगेश महाडिक यांनी सांगून काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय आदी पक्षाचे लोक या आंदोलनात सहभागी होत असतील तर युवकांनी या आंदोलनात सामील व्हावे, असे योगेश महाडिक यांनी सांगितले.
या संदर्भात पुढील बैठक बुधवारी, 8 जून 2022 रोजी संध्याकाळी 6 वाजता बीएसएनएल ऑफिस समोरील रमाई भवनात आयोजित करण्याचे सर्वांचे मध्ये ठरले. सदर बैठकीत व्यवस्थापन समिती निवडण्यात आली. या समितीत अनिकेत मोहिते, योगेश महाडिक, सुशांत सोनवणे, सुरज देवकाते, अवधूत काटे, सुजय रणदिवे, चैतन्य गालिंदे, अभिजीत कांबळे, आकाश कांबळे, भास्कर दामोदरे आदींची निवड करण्यात आली. तसेच संपर्क अभियानात अभिलाश बनसोडे, शुभम कांबळे, सम्राट गायकवाड यांची निवड करण्यात आली. प्रत्यक्ष युवकांची गाठीभेटी घेण्यासाठी अनिकेत मोहिते, भास्कर दामोदरे, अभिजीत कांबळे, सम्राट गायकवाड यांची निवड करण्यात आले. सदर बैठकीचे समारोप यशपाल (बंटी दादा) भोसले यांनी केले. या बैठकीत उपस्थितीत कार्यकर्त्यांचे आभार आभार सुरज देवकाते यांनी मानले.
अनुसूचित जातीवर (महार, मातंग, चांभार, ढोर, मांग-गारुडी, खाटीक, मेहत्तर, होलार) नगरपालिकेने निवडणूक प्रभागरचनेमध्ये केलेल्या अन्याया विरूद्ध उपाय व योजना करणेबाबत विचारविनिमय करण्यासाठी बैठक
दिनांकः- 8 जून 2022
ठिकाणः- बीएसएनएल ऑफिस समोर माता रमाई भवन, बारामती
वेळः- सायंकाळी 5 वाजता
टिप- स्वाभिमानी माणसांनी बैठकीला उपस्थित राहावे. लाचार, गुलाम व हुजरेगिरी करणाऱ्यांनी येऊ नये.