बारामती, 2 ऑगस्टः बारामती शहरातील भिगवण रोड शेजारील पंचायत समिती समोरील हांगे कॉर्नर समोर आंबा आणि जांभूळ फळाचे झाड होते. मात्र केवळ हॉटेलला अडथळा ठरत असणाऱ्या या वृक्षांवर कुऱ्हाड चालवत ती वृक्ष संबंधितांकडून तोडण्यात आली आहे.
सदर वृक्षतोड संदर्भात बारामती नगरपरिषदेला 1 ऑगस्ट 2022 रोजी सामाजिक कार्यकर्ते तथा वृक्षप्रेमी दयावान दामोदरे यांनी तक्रारी अर्ज दाखल केला आहे. या तक्रारी अर्जात बेकायदेशीर वृक्षतोडची पंचनामे व्हावी, वृक्षतोडल्या बद्दल संबंधितांची चौकशी व्हावी, तसेच वनसंरक्षण अधिनियमन कायदा 2018 अन्वये संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, वृक्ष तोड करण्याआधी संबंधितांकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सदर वृक्षतोड ही बेकायदेशीरपणे झाल्याची माहिती समोर आली आहे. आता सदर प्रकरणात संबंधितांवर कठोर कारवाई होणार का? की वृक्षतोड करणाऱ्यांना बारामती नगर परिषद अभय देणार? हे येणाऱ्या काळात समोर येणार आहे.
लोकांना झाड तोडताना लाज कशी वाटत नाही? बुद्धी काय घाण ठेवली का यांनी?