दिल्ली, 26 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत (दि.25) ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सवर तब्बल 309 धावांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे हा विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय ठरला. ही कामगिरी नोंदवताना ऑस्ट्रेलियाने स्वतःचाच विक्रम मोडला आहे. यापूर्वी त्यांनी 2015 च्या विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध 275 धावांनी विजय मिळवला होता. तसेच एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील दुसरा सर्वात मोठा विजय आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने 50 षटकांत 8 बाद 399 धावा केल्या होत्या. तर प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ 21 षटकांत 90 धावांत गारद झाला.
राज्यातील 13 लाख 45 हजार शेतकरी ‘या’ योजनेसाठी पात्र
तत्पूर्वी, या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात जलद शतक ठोकले. मॅक्सवेलने हे शतक 40 चेंडूत शतक झळकावले. त्याने यावेळी 44 चेंडूत 106 धावा केल्या. मॅक्सवेलने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 8 षटकार मारले. त्याचबरोबरच मॅक्सवेलने दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करामचा जलद शतकाचा विक्रम मोडला. विशेष म्हणजे, याच वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करामने दिल्लीतील याच मैदानावर श्रीलंकेविरुद्ध 49 चेंडूत शतक पूर्ण करून नवा विक्रम केला होता. दरम्यान, आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मॅक्सवेल व्यतिरिक्त डेव्हिड वॉर्नरने 109 धावांची शानदार खेळी केली. यावेळी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने पुन्हा एकदा संघाला दमदार सुरुवात करून दिली. तसेच त्यानंतर खेळण्यासाठी आलेल्या स्टीव्ह स्मिथ (71), मार्नस लॅबुशेन (62) यांनी अर्धशतके केली.
वर्ल्डकपमध्ये डी कॉकची बॅट तळपली, पोहोचला अव्वल स्थानी
त्यानंतर ऑस्ट्रेलियाने अप्रतिम गोलंदाजी करत 21 व्या षटकात नेदरलँड्सचा पराभव केला. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या ॲडम झाम्पाने सर्वाधिक 4 गडी बाद केले. यासोबतच मिचेल मार्शने 2, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. या सामन्यात नेदरलँड्सचे केवळ पाच फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले नाहीत. तर विक्रमजीत सिंगने संघाकडून सर्वाधिक 25 धावा केल्या. या विजयामुळे ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत 6 गुणांसह चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे.
One Comment on “ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय!”