चौथ्या कसोटी सामना; ऑस्ट्रेलियाने केला भारताचा 184 धावांनी पराभव, मालिकेत 2-0 अशी आघाडी

मेलबर्न, 30 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 184 धावांनी पराभूत केले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे, आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या आशा देखील वाढल्या आहेत. तर आता आगामी पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा असणार आहे पाचवा सामना. 3 जानेवारी 2025 पासून सिडनीमध्ये हा सामना खेळवला जाईल.

https://x.com/BCCI/status/1873618455242719586?t=xnWjHTw_d6QBTrMsoBenZA&s=19

भारताचा दुसरा डाव 155/10

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 340 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना भारतीय संघाचा डाव 155 धावांत संपुष्टात आला. भारताच्या प्रमुख फलंदाजांमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि रिषभ पंत यांनी निराशा केली. यशस्वी जयस्वालने 84 धावांची संघर्षपूर्ण खेळी केली, पण तोही भारताच्या पराभवाला थांबवू शकला नाही.

भारतीय फलंदाजांची खराब कामगिरी

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 474 धावा केल्या होत्या. भारताने त्याला प्रत्युत्तर देत 369 धावा केल्या, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 105 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 234 धावा केल्या, ज्यामुळे भारताला 340 धावांचे लक्ष्य दिले गेले. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाज रोहित शर्मा (9 धावा), केएल राहुल (0), विराट कोहली (5), रिषभ पंत (30), रवींद्र जडेजा (2) आणि नितीश कुमार रेड्डी (1) यांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताला मोठा धक्का बसला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज पॅट कुमिन्स आणि स्कॉट बोलंड यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या, नॅथन लायनने 2 विकेट्स घेतल्या, तर मिशेल स्टार्क आणि ट्रेव्हिस हेड यांनी 1-1 विकेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *