बारामतीत नवीन मालिकेतील आकर्षक क्रमांकांचा होणार लिलाव

बारामती, 1 ऑक्टोबरः बारामती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात लवकरच दुचाकी वाहनांसाठी ‘बीएच’ ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यात येणार आहे. तसेच उर्वरित क्रमांकासाठी दुचाकी वाहनांबाबत आगाऊ अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी बारामतीच्या उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात हवे असणारे आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने तो मिळावा, यासाठी ही कार्यपद्धती सुरू केली आहे. ज्या चारचाकी वाहन मालकांना नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित तीनपट शुल्क भरून हवे असतील, त्यांनी 3 ऑक्टोबर 2022 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 10.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा.

संजय गांधी निराधार योजनेची तब्बल 348 प्रकरणे मंजूर

दुचाकी मालिकेतील उर्वरित आकर्षक नोंदणी क्रमांक दुचाकी वाहनांसाठी आरक्षित करण्यासाठी 3 ऑक्टोबर रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 या दरम्यान विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा. अर्ज कार्यालयाच्या नवीन वाहन नोंदणी विभागात धनाकर्ष (डीडी), पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह आधारकार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकासह जमा करावा. हा डीडी ‘Dy.R.T.O. Baramati’ यांच्या नावे राष्ट्रीयकृत, अनूसचित बँकेचा बारामती येथील असावा. अर्जदाराने ओळख पटविण्यासाठी अर्जासोबत फोटो ओळखपत्र तसेच पत्त्याच्या पुराव्यासाठी आधारकार्ड, दूरध्वनी देयक आदींची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे.

पुन्हा रंगणार BPL-4 मधील खेळाडूंचा लिलाव

चारचाकी वाहनांसाठी क्रमांकांची यादी 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 5 वाजता कार्यालयीन सूचना फलकावर लावण्यात येईल. यादीमधील अर्जदारांना लिलावासाठी जास्त रकमेचा डीडी जमा करावयाचा असल्यास 4 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा. डीडी जमा केला त्याच दिवशी दुपारी 4 वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या कक्षेत नोंदणी प्राधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पात्र व्यक्तीसमोर लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दीष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल, त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाणार आहे.

चार चाकी खाजगी संवर्गातील तिप्पट रक्कमेच्या पसंती क्रमांकाची प्रक्रिया 3 ऑक्टोबर रोजी पुर्ण झाल्यावर दुचाकी मालिकेतील दुचाकी वाहनांसाठी उर्वरित पसंती नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी विहीत शुल्काच्या डीडीसह अर्ज कार्यालयीन वेळेत 6 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2 या दरम्यान स्विकारण्यात येणार आहे. दुचाकी मालिकेतील दुचाकी वाहनांसाठी उर्वरित पसंती नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी स्विकारलेल्या एकाच नंबरसाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी 6 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल.

एकाच नंबरसाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास, त्या नंबरचे बंद पाकिट लिलाव पध्दतीने वाटप केले जाईल. या यादीतील अर्जदारांना लिलावासाठी जर जास्त रक्कमेचा डीडी जमा करावयाचा असेल, त्यांनी 7 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत सीलबंद लखोट्यात लिलावासाठी पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी विनिर्दिष्ट केलेल्या फीच्या डीडी व्यतिरिक्त अर्जदाराचे इच्छेप्रमाणे जादा रक्कमेचे डीडी एका लखोट्यात स्वतः जमा करावा. सदर डीडी ‘Dy.R.T.O., Baramati’ यांच्या नांवे राष्ट्रीयकृत/शेड्युल्ड बैंक बारामतीचा असावा.

बारामती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात 7 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 4 वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्यक्तींसमोर लखोटा उघडून, ज्या अर्जदाराने विनिर्दीष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रक्कमेचा डीडी सादर केला असेल, त्यास नमुद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.

बारामतीत आरटीओ वसुलीचे टार्गेट पुर्ण?

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही, तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व शुल्क सरकारजमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क परत करता येणार नसल्याचे बारामती उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

 

BPL- 4  Live ऑक्शन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *